Marlanathpur : संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे महाराष्ट्रातील ‘हे’ गाव आपल्याला माहीत आहे का ?

Marlanathpur : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे गाव महाराष्ट्रातील पहीले सौर ऊर्जेवर चालणारे गाव (First Solar powered village) म्हणून ओळखले जाणार आहे. 'मरळनाथपूर' (Marlanathpur) असे या गावाचे नाव आहे.

415
Marlanathpur : संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे महाराष्ट्रातील 'हे' गाव आपल्याला माहीत आहे का ?
Marlanathpur : संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे महाराष्ट्रातील 'हे' गाव आपल्याला माहीत आहे का ?

राज्यात एक असेही गाव तयार झाले आहे की, जेथे घराघरांत सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. ते गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ‘मरळनाथपूर’ हे आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचे हे गाव आहे. मरळनाथपूर आता महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव (First Solar powered village) म्हणून ओळखले जाणार आहे. मरळनाथपूरला या आपल्या गावाला 100 टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट (First pilot project) अशी मान्यता मिळाली आहे.

(हेही वाचा – Indigo Bumper 2023 : २०२३ मध्ये इंडिगो एअरलाईन्समधून १०० दशलक्ष प्रवाशांनी केला प्रवास)

गावातील सर्व घरे, शाळा सौरऊर्जेवर चालणार

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रयत्नामुळे मरळनाथपूरमधील (Marlanathpur) सर्व घरे, ग्रामपंचायत ऑफिस, पाणीपुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्था यांची ऊर्जेची 100 टक्के गरज सौरऊर्जेने भागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मरळनाथपूर या गावाला 100 टक्के सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून ‘महाराष्ट्रातील पहिला पायलट प्रोजेक्ट’ अशी मंजूरी मिळाली आहे.

(हेही वाचा – David Warner : ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर जेव्हा सामन्यासाठी हेलिकॉप्टरमधून थेट मैदानात उतरला)

या प्रकल्पामुळे मरळनाथपूर हे गाव सौरऊर्जा स्वयंपूर्ण होणार आहे. या निर्णयानंतर सदाभाऊ खोत यांचा मरळनाथपूर (Marlanathpur) गावामध्ये भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.