NSE, BSE Special Trading Session : पुढील आठवड्यात एनएससी, बीएससीवर विशेष ट्रेडिंग सत्र

शेअर बाजारातील आपत्कालीन ऑनलाईन ट्रेडिंग यंत्रणेची तपासणी या निमित्ताने होणार आहे. आणि या लाईव्ह ट्रेडिंग सत्राच्या निमित्ताने दोन्ही शेअर बाजारातील यंत्रणा या नवीन व्यासपीठावर बदलणार आहे.

314
NSE, BSE Special Trading Session : पुढील आठवड्यात एनएससी, बीएससीवर विशेष ट्रेडिंग सत्र
NSE, BSE Special Trading Session : पुढील आठवड्यात एनएससी, बीएससीवर विशेष ट्रेडिंग सत्र
  • ऋजुता लुकतुके

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) तसंच बाँबे स्टॉक एक्सचेंजवर (Bombay Stock Exchange) येत्या शनिवारी २० जानेवारीला दोन विशेष ट्रेडिंग सेशन आयोजित करण्यात येणार आहेत. कॅश तसंच डेरिव्हेटिव्ह या दोन्ही सेगमेंट्समध्ये हे ट्रेडिंग होईल. शेअर बाजारातील (stock market) आपत्कालीन ऑनलाईन ट्रेडिंग यंत्रणेची तपासणी या निमित्ताने होणार आहे. आणि या लाईव्ह ट्रेडिंग सत्राच्या निमित्ताने दोन्ही शेअर बाजारातील यंत्रणा या नवीन व्यासपीठावर बदलणार आहे. (NSE, BSE Special Trading Session)

कॅश तसंच डेरिव्हेटिव्ह प्रकारात अपर आणि लोअर सर्किटच्या मर्यादा बदलण्यात येणार आहेत. फ्युचर आणि ऑपशनमधील शेअर ५ टक्क्यांच्या सर्किटने चालतील. तर इतर शेअरवर २ टक्क्यांचं सर्किट लागेल. (NSE, BSE Special Trading Session)

(हेही वाचा – Shri Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठाला चारही शंकराचार्यांचा विरोध आहे का? अखेर पुरीच्या शंकराचार्यांनी केला खुलासा )

२० जानेवारीच्या दिवशी पहिलं सत्र ९ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल. आणि ते १० वाजता संपेल. तर दुसरं सत्र साडेअकरा वाजता सुरू होईल. आणि ते साडेबारा वाजता संपेल. सेबीच्या नियमानुसार, नेहमीची ट्रेडिंग साईट आणि आपत्कालीन साईट या दोन्ही नीट सुरू आहेत याची नियमित तपासणी आवश्यक आहे. त्यानुसार हे सत्र आयोजित करण्यात येत आहे. (NSE, BSE Special Trading Session)

पण, २० जानेवारी हा सेटलमेंट हॉलिडे असल्यामुळे त्या दिवशी आदल्या दिवशीच्या फ्युचर, ऑपशन आणि बाय टुडे, सेल टुमारो प्रकारातील पैसे त्या दिवशी खात्यात जमा होणार नाहीत. ते सोमवारीच जमा होतील. (NSE, BSE Special Trading Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.