अयोध्येत (Ayodhya) श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला करण्यात येणार आहे. (Ayodhya Ram Mandir) मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरात विविध स्तरावर तयारी चालू आहे. परदेशातही रामजन्मभूमीचा उत्साह आहे. आतापर्यंत १६० देशांनी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रक्षेपण दाखवणार असल्याचे जाहीर केले आहे.
(हेही वाचा – Maratha Survey : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामासाठी वाढीव मानधन)
मॉरिशसमध्ये दोन तासांची विशेष सुट्टी
राममंदिर प्रतिष्ठापना कार्यक्रमाचा भक्तांना आनंद घेता यावा, यासाठी देशातील काही राज्यांनी सुट्टी घोषित केली आहे. आता मॉरिशस (Mauritius) सरकारनेही या कार्यक्रमासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. हिंदू अधिकाऱ्यांसाठी मॉरिशस सरकारने 22 जानेवारी रोजी दोन तासांची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे हिंदू अधिकाऱ्यांना हा सोहळा पाहता येईल. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ (Pravind Kumar Jugnauth) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने ही घोषणा केली आहे.
हिंदू अधिकाऱ्यांच्या भावना आणि परंपरांचा आदर करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी सांगितले.
७ दिवस चालणार सोहळा
22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामजन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामलल्लाची स्थापना होणार आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. १६ जानेवारीपासून हा उत्सव सुरू होणार आहे. ७ दिवस हा सोहळा चालणार आहे.
मॉरिशसमध्ये हिंदू लोकसंख्या लक्षणीय
मॉरिशसमध्ये (Mauritius) हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. येथे हिंदूंची लोकसंख्या 48.5 टक्के आहे. इतक्या मोठ्या संख्येने हिंदू रहात असलेला हा आफ्रिकेतील (Africa) एकमेव देश आहे. हिंदू लोकसंख्येच्या क्रमवारीत जागतिक पातळीवर भारत आणि नेपाळनंतर मॉरिशसचा क्रमांक लागतो. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community