MNS : मकर संक्रातीच्या शुभेच्छांमधून मनसेचे जनतेला आवाहन

येत्या सोमवारी १५ जानेवारी रोजी मकर संक्रातीच्या सणा निमित्त मनसेच्यावतीने विविध भागामध्ये बॅनर लावत लावत जनतेला या सणाच्या गोड गोड शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जनतेला केवळ या सणाच्या शुभेच्छाच न देता या सणानिमित्त उडवल्या जाणाऱ्या पतंगाच्या खेळामध्ये चायनीज मांजाचा वापर न करण्याचेही आवाहन केले आहे.

1701
MNS : मकर संक्रातीच्या शुभेच्छांमधून मनसेचे जनतेला आवाहन
MNS : मकर संक्रातीच्या शुभेच्छांमधून मनसेचे जनतेला आवाहन

येत्या सोमवारी १५ जानेवारी रोजी मकर संक्रातीच्या सणा निमित्त मनसेच्यावतीने विविध भागामध्ये बॅनर लावत लावत जनतेला या सणाच्या गोड गोड शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जनतेला केवळ या सणाच्या शुभेच्छाच न देता या सणानिमित्त उडवल्या जाणाऱ्या पतंगाच्या खेळामध्ये चायनीज मांजाचा (Chinese Manja) वापर न करण्याचेही आवाहन केले आहे. त्यामुळे मनसेने (MNS) शुभेच्छातून जनतेमध्ये पतंग उडवताना कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी याबाबत केलेल्या जनजागृतीबाबत जनतेकडून कौतुक केले जात आहे. (MNS)

महाराष्ट्र नविर्माण सेनेच्या (MNS) शाखा क्रमांक १९१च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेना नेते संदीप देशपांडे आणि शाखाध्यक्ष संतोष साळी यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्याचा फलक लावला आहे. या शुभेच्छाच्या फलकाद्वारे मनसेने पंतग उडविण्याचा आनंद तुम्हीही घ्या व इतरांनाही घेऊ द्या… चायनीज मांज्याचा (Chinese Manja) वापर टाळा. धारवाल्या मांज्याचा वापर असा करा, जेणेकरून कोणाच्याही जीवाला दुखापत होणार नाही, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. (MNS)

(हेही वाचा – Governor Ramesh Bais : ‘विकसित भारत’ लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण व आरोग्य व्यवस्था आवश्यक)

मांज्यामुळे मुंबईतच मागील पाच वर्षांत सहा जणांचे गेले बळी

सांताक्रुझ वाकोला पुलावर ड्युटी संपवून जाणाऱ्या पोलिसाचा गळा पतंगांच्या मांज्यामुळे चिरला गेला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिस अधिकारी हा वरळीला राहणारे होते आणि दिडोंशी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. परंतु पतंगाचा मांजा हा चायनीजचा असल्याने पुन्हा एकदा चायनीज मांज्याबाबतची (Chinese Manja) गंभीरता तीव्र होऊ लागली आहे. सन २०१८मध्ये या पतंगाच्या मांज्यामुळे अनेकांचे गळे चिरले गेले, त्यामुळे या मांज्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सन २०१८ पासून आजतागायत मागील पाच वर्षांत मुंबईतच सहा जणांचे बळी गेले आहेत, तर दोन जण जखमी झाले आहेत. (MNS)

मनुष्यच नाही तर पक्ष्यांसाठीही हा मांजा मोठ्याप्रमाणात घातक ठरत आहे. या चायनीज मांजामुळे (Chinese Manja) दरवर्षी शेकडो पक्षी मृत होतात तर तेवढ्याच संख्येने पक्षी जखमी होत असल्याने या पतंगाच्या मांजामुळे बळी जाणाऱ्यांना जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एका बाजुला चायनीज मांज्याच्या (Chinese Manja) विक्रीवर बंदी आणून वापरावरही बंद आणली तरी याची विक्री होऊन भविष्यात यामुळे कोणाचेही गळे चिरले जाऊ नये तसेच पक्षी जखमी होऊ नये याची काळजी घेत मनसेने (MNS) शुभेच्छा देतानाच जनतेला या मांज्याचा वापर न करण्याचे आवाहन केल्याचे पहायला मिळत आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.