सकाळचा नाश्ता महत्त्वाचा आहे. आपण सकाळी असा नाश्ता केला पाहिजे जेणेकरून आपले पोट बराच काळ भरलेले असेल आणि शरीराला पुरेशी उर्जेदेखील मिळेल. (Low Calorie Breakfast) बरेच लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता टाळतात; परंतु असे करू नये. आज आम्ही तुम्हाला काही लो कॅलरी ब्रेकफास्ट सांगणार आहोत, जे खाल्ल्याने तुमचे पोटही भरेल आणि वजनही जास्त वाढणार नाही.
(हेही वाचा – Sagar Mahotsav : सागर महोत्सवात विद्यार्थ्यांनी अनुभवली समुद्री जैवविविधता; व्याख्याने, लघुपट यांच्या माध्यमातून जागृती)
इडली
इडली (Idli) हा अतिशय कमी उष्मांक असलेला नाश्ता आहे. इडली पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते आणि पचनालाही हलकी असते. यात ओमेगा 3 फॅटी एसिड्स (Omega 3 fatty acids) देखील असतात. ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
मुगाच्या डाळीचे घावन
मुगाच्या डाळीमध्ये (mung bean) प्रथिने, फायबर (fiber), ब जीवनसत्व, कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस, लोह, जीवनसत्व ई आणि मॅग्नेशियम असते. मूग डाळीच्या घावनमध्ये कॅलरीज देखील कमी असतात. ज्यामुळे वजन वाढत नाही आणि पचन सुधारते.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : ‘या’ देशाने 22 जानेवारीला दिली जाहीर सुट्टी)
पोहे
पोहे अनेकांना आवडतात. तुम्ही ते तुमच्या नाश्त्यात समाविष्ट करू शकता. पोहे हे देखील कमी उष्मांक असलेले अन्न आहे. पोहे खाल्ल्याने पोटही भरते आणि वजन नियंत्रणात रहाते.
आमलेट
तुम्ही सकाळी भाज्या घातलेले आमलेट खाऊ शकता. अंडी हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. भाज्यांनी भरलेले आमलेट खाल्ल्याने पोटही बराच काळ भरलेले राहते आणि वजन वाढण्याची चिंता रहात नाही. यासह हाडे आणि सांध्यांशी संबंधित आजारही बरे होतात. (Low Calorie Breakfast)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community