Milind Deora : काँग्रेस नेते देवरा यांचा आज शिवसेना प्रवेश

देवरा यांचे कार्यकर्ते वाळकेश्वर येथील तीन बत्ती परिसरात जमू लागले असून काँग्रेस पक्षात देवरा यांची होत असलेली मुस्कटदाबी त्यांच्यापासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे देवरा यांनी शिवसेना प्रवेशाच्या घेतलेल्या निर्णयाला त्यांनीही जोरदार पाठींबा दर्शवला आहे.

300
Milind Deora : काँग्रेस नेते देवरा यांचा आज शिवसेना प्रवेश

सुजित महामुलकर

काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांचे अखेर ठरले. आज (रविवारी) दुपारी देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे देवरा हे उद्या सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दाओस (Davos) दौऱ्यावर सोबत असणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

कार्यकर्त्यांचा जोरदार पाठींबा

देवरा यांचे कार्यकर्ते वाळकेश्वर (Walkeshwar) येथील तीन बत्ती परिसरात जमू लागले असून काँग्रेस पक्षात देवरा यांची होत असलेली मुस्कटदाबी त्यांच्यापासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे देवरा यांनी शिवसेना (Shiv Sena) प्रवेशाच्या घेतलेल्या निर्णयाला त्यांनीही जोरदार पाठींबा दर्शवला आहे.

(हेही वाचा – Loksabha : पंतप्रधान मोदींनी उद्घाटन, भूमिपूजन केलेल्या विकास प्रकल्पांमुळे ‘या’ ११ लोकसभेच्या जागांवर महायुतीला होणार लाभ)

महायुतीत गोंधळाची परिस्थिती

देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपची (BJP) मात्र गोची झाली असून दक्षिण मुंबई मतदार संघात महायुतीत नवा दावेदार निर्माण झाला आहे. भाजपकडून राज्यसभा खासदार पियुष गोयल यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना देवरा यांच्या महायुतीतील प्रवेशाने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा तिढा शिंदे कसा सोडवतात, हे बघणं महत्वाचं आहे.

अन्यथा शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभा

देवरा यांच्यासाठी शिवसेना दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी (South Mumbai Lok Sabha Constituency) भाजपकडे आग्रह धरणार असून जर काही तडजोड नाहीच झाली तर देवरा यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

(हेही वाचा – NSE, BSE Special Trading Session : पुढील आठवड्यात एनएससी, बीएससीवर विशेष ट्रेडिंग सत्र)

देवरा आणि सेना दोघांच्या पथ्थ्यावर

भाजपमध्ये आता काँग्रेसमधील मोठा गट वगळता ‘इनकमिंग’ बंद झाल्याने देवरा यांना शिवसेनेचा आधार घ्यावा लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्याचप्रमाणे देवरा यांना दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होण्याची संधी मिळेल तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेला देवरा यांच्यासारखा ‘कॉस्मोपोलिटन’ चेहेरा दिल्लीच्या राजकारणासाठी मिळेल. हत्यामुळे हा समझोता देवरा आणि सेना या दोघांच्या पथ्थ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.