Bhujbal Family Bank Notice : नाशिक जिल्हा बँकेकडून भुजबळ कुटुंबाला कर्ज वसुलीची नोटीस

कायदा कायदा आहे. छगन भुजबळ काही कायद्याच्या पुढे मोठा नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर नोटीस जाणारच - छगन भुजबळ

224
Bhujbal Family Bank Notice : नाशिक जिल्हा बँकेकडून भुजबळ कुटुंबाला कर्ज वसुलीची नोटीस

माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नाशिक जिल्हा बँकेने नोटीस बजावली आली आहे. (Bhujbal Family Bank Notice) कर्ज थकवल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

(हेही वाचा – Cold Weather Update : गारठा वाढणार; पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात घट होणार)

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे कर्ज थकवल्या प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेने माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस (Bhujbal Family Bank Notice) बजावली आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या मालकी असलेल्या मालेगावच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखान्यावर असलेल्या ५१ कोटी ६६ लाख थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी येथे जाऊन आर्म स्ट्रॉगच्या गेटवर ही नोटीस चिटकवली आहे.

(हेही वाचा – Milind Deora : काँग्रेस नेते देवरा यांचा आज शिवसेना प्रवेश)

छगन भुजबळ काय म्हणाले?

बँकेच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, ”आम्ही १२ कोटी रुपये आर्मस्ट्राँग कारखान्यावर कर्ज घेतलं होतं. ईडीने हा कारखाना अटॅच केला आहे. बँकेने तो कारखाना कधीही लिलाव केला तर यापेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील. कायदा कायदा आहे. छगन भुजबळ काही कायद्याच्या पुढे मोठा नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर नोटीस (Bhujbal Family Bank Notice) जाणारच.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.