जगातील पहिले सप्त तारांकीत शाकाहारी हॉटेल अयोध्यामध्ये (Ayodhya) उभारण्यात येणार आहे. जगात कुठेही असे हॉटेल सापडणार नाही जे पूर्णपणे शाकाहारी आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. आता नवा भारत, नवा उत्तर प्रदेश आणि नवी अयोध्या दिसणार आहे.
बड़ी बख़बर- #अयोध्या में बनेगा दुनिया का पहला सेवन स्टार शाकाहारी होटल।
योगी आदित्यनाथ ने कहा कि उन्हें इसके लिए प्रस्ताव मिला है।@myogiadityanath ने यह भी घोषणा की कि हर साल 22 जनवरी को ‘प्राण प्रतिष्ठा’ (अभिषेक) समारोह मनाने के लिए धार्मिक समारोह आयोजित किए जाएंगे।… https://t.co/rNWyrpKDAb pic.twitter.com/JWjcJ6QFrS
— brjbharat (@brjbharat) January 14, 2024
अयोध्येमध्ये (Ayodhya) २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी देशभरासह जगभरातून हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. या विमानतळातील जुनी धावपट्टी 167 एकरांवर पसरलेली असून ती निरुपयोगी होती. सरकारी विमानही तिथे उतरू शकले नाही. विमानतळ प्राधिकरणाला 821 एकर जमीन कालमर्यादेत उपलब्ध करून दिली, त्यानंतर हे काम वेगाने झाले. आता नवीन विमानतळामुळे सर्व दिशांनी अयोध्येला (Ayodhya) पोहोचणे सोपे झाले. अयोध्येला फोर लेन आणि सिक्स लेन कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. लखनौ ते अयोध्या, गोरखपूर ते अयोध्या, प्रयागराज ते अयोध्या, वाराणसी ते अयोध्या. शहरात सुलभ रस्तेही बांधण्यात आले आहेत. अयोध्येत फोर लेन आणि सिक्स लेन कनेक्टिव्हिटी झाली आहे.
Join Our WhatsApp Community