भारतीय जनता पक्षाच्यावतीने महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा तसेच आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहर अध्यक्ष धीरज घाटे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नामदेव माळवदे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश पिंगळे, माजी आमदार योगेश टिळेकर, विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, संघटन सरचिटणीस गणेश घुले, विधानसभा अध्यक्ष अनिल येवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचीतांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
(हेही वाचा – India Maldives conflict : चीन भेटीनंतर मालदीवचा भारताला अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले …)
हडपसर येथील ससाणेनगरच्या स्मिता गायकवाड यांच्या कार्याची दखल घेत शहर भाजपा ओ.बी.सी. आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मांजरी बुद्रुक येथील विद्याधर भोसले यांच्यावर एससी-एसटी आघाडीच्या हडपसर मंडल सरचिटणीस पदाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community