Maldives : मालदीवच्या अध्यक्षांचा पुन्हा भारताला इशारा; म्हणाले…

341

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमानकारक उल्लेख करणाऱ्या मालदीवच्या (Maldives) तीन मंत्र्यांमुळे भारतासह जगभरातील भारतीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. भारतीयांनी मालदीवला पर्यटन न करण्याचा निर्णय घेत बहिष्कार टाकला. त्यानंतर मालदीवचे अध्यक्ष चीनच्या दौऱ्यावर गेले, तेव्हापासून त्यांनी दोन वेळा भारताला इशारा दिला आहे.

(हेही वाचा Milind Deora : …तर मला आणि एकनाथ शिंदे यांना निर्णय घ्यावा लागला नसता; मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्ष सोडण्यामागील सांगितले कारण)

काय म्हणाले मुइज्जू?

मालदीवचे (Maldives)  अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनला जाऊन चीनच्या नागरिकांनी मालदीवला येऊन पर्यटन करावे, असे आवाहन केले. त्यानंतर मुइज्जू यांनी शनिवार, १३ जानेवारी रोजी चीनमधून मायदेशी परतल्यावर  भले आम्ही लहान देश असू शकतो, असे असले म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा किंवा दाबण्याचा परवाना मिळालेला नाही, असे मुइज्जू म्हणाले होते. त्यानंतर १४ मार्च रोजी मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताची एक मोठी सैन्यतुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवमधील आधीच्या सरकारने केलेल्या विनंतीनंतर भारताने मालदीवमध्ये एक सैन्यतुकडी तैनात केली होती. तेथील सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतल्या बचाव कार्यासाठी भारतीय लष्कराने एक सैन्यतुकडी मालदीवला पाठवली होती. परंतु, नव्या सरकारने भारताला आणखी एक इशारा दिला आहे. मुइज्जू म्हणाले की, भारताने १५ मार्चआधी मालदीवमधून आपले सैनिक हटवावे, असा इशारा दिला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.