सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. युत्या आणि आघाड्या बनवण्यात राजकीय पक्ष व्यस्त आहेत. अशा वेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केलेले वक्तव्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आगामी निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल, असे वक्तव्य शशी थरूर (Shashi Tharur) यांनी केले आहे. काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य केल्याने दिल्लीचा राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
(हेही वाचा Ashwini Bhide : महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजकडून वर्णभेदाचा अनुभव? )
भाजप लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. मात्र, त्यांच्या जागांमध्ये ब-याच कमी होतील. गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपला कमी जागा मिळल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील पक्षांचा भाजपवरचा विश्वास उडेल. भाजपचे मित्रपक्ष विरोधी पक्षांसोबत जातील. इंडिया आघाडीने योग्यप्रकारे जागा वाटप केले, तर पराभवापासून वाचता येईल. केरळमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेससाठी जागावाटप करारावर एकमत होणे कठीण आहे. पण, तामिळनाडूमध्ये, सीपीआय, सीपीआय(एम), काँग्रेस आणि डीएमके सर्व युतीमध्ये आहेत आणि कोणताही वाद होणार नाही, असेही थरुर (Shashi Tharur) म्हणाले.
Join Our WhatsApp Community