Manoj Jarange : आंदोलनापूर्वीच बच्चू कडू मनोज जरांगेच्या भेटीला; नक्की काय आहे या मागचे कारण?

आमदार बच्चू कडू हे सोमवारी ( १५ जानेवारी) सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवली सराटी येथे दाखल झाले. तर आपण हे आंदोलन थांबवायला नव्हे तर त्यांच्या बरोबर या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले.

224
Manoj Jarange : आंदोलनापूर्वीच बच्चू कडू मनोज जरांगेच्या भेटीला; नक्की काय आहे या मागचे कारण?

मराठा आरक्षणासाठी गेल्या महिनाभरापूर्वीच मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेली २४ डिसेंबरची मुदतही कधीच उलटून गेली आहे. मात्र अद्याप मराठा आरक्षणाबाबत सरकारला कोणतेही ठोस घोषणा करता आलेली नाही. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करून सरकारच्या अडचणीत वाढ केली आहे. तसेच आंदोलकही मोठ्या प्रमाणावर जमणार आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्ववभूमीवर आमदार बच्चू कडू हे सोमवारी ( १५ जानेवारी) सकाळी मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवली सराटी येथे दाखल झाले. तर आपण हे आंदोलन थांबवायला नव्हे तर त्यांच्या बरोबर या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. (Manoj Jarange)

जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचं सांगितले आहे. मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकही मोठ्या संख्येने जमणार आहेत. यासंदर्भात बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, मराठयांना आरक्षण कसे मिळेल यासाठी चर्चा करायला आपण आलो आहोत. कारण चर्चा केल्याशिवाय मार्ग निघत नाही. असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

(हेही वाचा : Ind vs Afg 2nd T20 : अफगाणिस्तान विरुद्धच्या विजयात युवा यशस्वी आणि शिवम चमकले)

तोडगा निघाला तर तो आंदोलनापूर्वीच निघाला पाहिजे

आतापर्यंत सरकारने साधारणपणे ८० टक्के काम केल्याचे काम पाहावयास मिळत आहे. जातीचे दाखले मिळणे गरजेचे आहे. प्रश्नासनाने हे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. तर मी हे आंदोलन थांबविण्यासाठी नव्हे तर स्वतःच आंदोलनातं सहभागी होणार असे बच्चू कडू म्हणाले. तोडगा निघाला तर तो आंदोलनापूर्वीच निघाला पाहिजे असेही बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने अजून काय काम केले पाहिजे ही पाहण्यासाठी आपण आलो असल्याचेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.