मुंबई मधील काळाचौकी परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी (१५ जानेवारी) सकाळी घडली. तर मुंबईमधील काळाचौकी परिसरातल्या बंद पडलेल्या शाळेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. ऑक्सिजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर आली. तब्बल 6 ते 7 ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला होता. स्फोटाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.(Kala chowki Fire)
(हेही वाचा : Accident : दुचाकी आणि स्कॉर्पिओच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षिक जागीच ठार)
काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये सहा सिलेंडरचे स्फोट झाले आहे. सहा वेळा स्फोटांचे आवाज झाल्याचे स्थानिकांकडून माहिती मिळत आहे. तर या शाळेचा वापर कोविड काळात या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती.मात्र त्या कोविड काळात वापरलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते. या स्फोटामध्ये गाडयांना आग लागली. या विभागातील विद्यार्थी अनेक ठिकाणी पाठविण्यात आल्याने येथे सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.मात्र या बंद शाळेत कशी आग लागली याची चौकशी सुरु असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. (Kala chowki Fire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community