President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसाच्या मेघालय आणि आसाम दौऱ्यावर

१७ जानेवारी रोजी, राष्ट्रपती मुर्मू आसाममधील दिफू येथील तरालांगसो येथे कार्बी युवा महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

176
Red Fort Attack Case: पाकिस्तानी दहशतवाद्याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती मुर्मू यांनी फेटाळला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) १५ ते १७ जानेवारी दरम्यान मेघालय आणि आसामला भेट देतील, असे राष्ट्रपती भवनने रविवारी (१४ जानेवारी) जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रपती (President Droupadi Murmu) आज म्हणजेच १५ जानेवारी सोमवारी तुरा येथील पी. ए. संगमा स्टेडियमवर मेघालय खेळांचे उद्घाटन करतील, असे त्यात म्हटले आहे. राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच मेघालय दौरा आहे.

(हेही वाचा – India Maldives conflict : भारताने १५ मार्चपर्यंत मालदीवमधून सैन्य हटवावे – अध्यक्ष मोइझू)

असा असेल राष्ट्रपतींचा दौरा –

जानेवारी १६ रोजी राष्ट्रपती (President Droupadi Murmu) बालजेक विमानतळ, तुरा येथे स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्यांना संबोधित करतील आणि नवीन एकात्मिक प्रशासकीय संकुलाची आभासी पद्धतीने पायाभरणी देखील करतील, असे निवेदनात म्हटले आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती मुर्मू मावफलांग येथे उपस्थितांना संबोधित करतील आणि अद्ययावत रोंगजेंग मंगसांग अदोकग्रे रोड आणि मैरंग रानीगोडाउन अझरा रोडचे आभासी उद्घाटन करतील तसेच कोंगथोंग, मावलिनगोट आणि कुडेनग्रिम या गावांमध्ये शिलाँग पीक रोपवे आणि पर्यटकांच्या निवासाची पायाभरणी करतील. (President Droupadi Murmu)

(हेही वाचा – Kala chowki Fire : मुंबईतील काळा चौकी परिसरात आठ सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही)

संध्याकाळी शिलॉंगच्या राजभवन येथे मेघालय सरकारतर्फे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी स्वागत समारंभाला राष्ट्रपती (President Droupadi Murmu) उपस्थित राहणार आहेत. १७ जानेवारी रोजी, राष्ट्रपती मुर्मू (President Droupadi Murmu) आसाममधील दिफू येथील तरालांगसो येथे कार्बी युवा महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.