ऋजुता लुकतुके
टाटा मोटर्सची पंच ही मिनी युटिलिटी व्हेईकल (Tata Punch EV) अर्थात एमयुव्ही भारतात अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. आणि तेव्हापासून लोक या गाडीच्या वीजेवर चालणाऱ्या मॉडेलच्या प्रतीक्षेत होते. ती प्रतीक्षा आता संपली असून टाटा पंच इव्ही या गाडीचं बुकिंगही कंपनीने गेल्याच आठवड्यात सुरू केलं आहे. फक्त २१,००० रुपये देऊन तुम्ही ही एमयुव्ही बुक करू शकता. अधिकृतपणे ती १७ जानेवारीला भारतात लाँचही होईल.
नवा लुक आणि नवं डिझाईन –
आधीच्या टाटा पंचच्या तुलनेत नवीन इव्ही (Tata Punch EV) गाडीला नवा लुक आणि नवं डिझाईन देण्यात आलं आहे. पंच इव्ही आणि पंच इव्ही लाँग रेंज असा दोन व्हेरिअंटमध्ये ही गाडी उपलब्ध होईल. ऑक्साईड डुआल-टोन, सीविक डुआल-टोन, व्हाईट डुआल-टोन आणि ग्रे तसंच लाल रंगात ही गाडी टाटा मोटर्सने आणली आहे. आणि आगाऊ बुकिंगमध्येच तरुणांच्या या गाडीवर उड्या पडताना दिसत आहेत.
(हेही वाचा – President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसाच्या मेघालय आणि आसाम दौऱ्यावर)
It’s pure.
It’s electric.
It’s first of its kind.
It’s a car that goes #BeyondEveryday
Meet Punch.ev!Bookings open: https://t.co/8VCVelpT9m#Punchev #ActiEV #TATAPunchev #TATAev #MoveWithMeaning pic.twitter.com/sE78jp92x1
— TATA.ev (@Tataev) January 5, 2024
वॉलबॉक्स चार्जर –
गाडी विजेवर (Tata Punch EV) चालणारी असल्यामुळे तिच्याबरोबर चार्जिंग किट येणार आहे. ते घरच्या घरी जलद चार्जिंग करुन देणारं युनिट आहे. त्यासाठी ७.२ किलोवॅट क्षमतेचा फास्ट होम चार्जर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एक वॉलबॉक्स चार्जरही असेल.
(हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा धमकीचा कंट्रोल रूम ला फोन, मुंबई पोलीस सतर्क)
गाडीची किंमत १२ ते १४ लाख रुपये –
या शिवाय या गाडीत (Tata Punch EV) आधुनिक एलईडी हेडलँप, मल्टीमोड रेगन, स्मार्ट डिजिटल डीआरएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत. गाडीतील इन्फोटेन्मेन्ट यंत्रणा ही हरमन कंपनीची आहे. तर गाडीच्या पुढच्या दोनही सिटना व्हेंटिलेशन आहे. ३६० अंशाचा सराऊंड व्ह्यू आहे. मोबाईल तसंच इतर उपकरणं चार्ज करण्यासाठी वायरलेस चार्जरही आहे. अशा या गाडीची किंमत १२ ते १४ लाख रुपयांच्या दरम्यान असेल. (Tata Punch EV)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community