भरुच येथील हॉस्पिटलमध्ये आग, १६ जणांचा मृत्यु! 

भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी कोविड सेंटर सुरु आहे. या कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली.  

132

महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरात राज्यातही कोरोना रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. येथील  भरुचमधील हॉस्टिपलला लागलेल्या आगीत तब्बल १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात दोन परिचारिकांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले. पटेल वेलफेअर रुग्णालयात रात्री जवळपास 12.30 वाजता ही दुर्घटना घडली. सध्या ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, भरुच जिल्ह्यातील पटेल रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी कोविड सेंटर सुरु आहे. या कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

(हेही वाचा : संयुक्त महाराष्ट्र कलादालनाला ११ वर्षे पूर्ण, तरीही एमटीडीसीच्या यादीत स्थान नाही!)

संपूर्ण आयसीयू वॉर्ड जाळून खाक 

अग्निशमन दलाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच या आगीत जखमी झालेल्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या अग्निशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मात्र ही घटना नेमकी कधी घडली, आग कशी लागली, याची अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सद्यस्थितीत या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना सिविल, सेवाश्रम, जंबूसर अल मेहमूद रुग्णालयांसह इतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.