ऋजुता लुकतुके
इंडोनेशियात जाकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता (Asian Olympic Qualifier) स्पर्धेत भारताच्या विजयवीर सिद्धूने २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात रौप्य पदक जिंकलं. पण, हे पदक त्याच्यासाठी ऑलिम्पिकचा दरवाजा उघडणारं ठरलं. सुवर्ण विजेता निकिता चिरयुकिन पात्रता निकषात बसत नव्हता. त्यामुळे या स्पर्धेतील २५ मीटर रॅपिड फायर ऑलिम्पिक कोटा विजयवीरला मिळाला. विजयवीर बरोबरच अनिष भनवाला या आणखी एका नेमबाजाने रॅपिड फायरमध्ये ऑलिम्पिक पात्रता मिळवलेली आहे.
(हेही वाचा – Tata Punch EV : टाटा पंचच्या वीजेवर चालणाऱ्या गाडीचं बुकिंग सुरू, किंमत ठाऊक आहे का?)
पॅरिस ऑलिम्पिक
गेल्यावर्षी कोरिया इथं झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप (Asian Olympic Qualifier) स्पर्धेत अनिशने ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. आता पहिल्यांदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रॅपिड फायर प्रकारात भारताचे दोन नेमबाज एकसाथ लढतील.
So @VijayveerSidhu does it in style winning 🥈 in the men’s 25m rapid-fire pistol to go along with the 17th @Paris2024 quota place. Well done lad👏🔥🇮🇳#IndianShooting. #AsiaOlympicQualification pic.twitter.com/BqhDklQfiZ
— NRAI (@OfficialNRAI) January 13, 2024
२५ मीटर रॅपिड फायर प्रकारातील सहा पैकी चार अंतिम फेरीतील स्पर्धक ऑलिम्पिकचं (Asian Olympic Qualifier) तिकीट मिळवण्यासाठी पात्र होते. प्राथमिक फेरीत चौथ्या असलेल्या विजयवीरने अंतिम फेरीत आपला खेळ उंचवला. सुवर्ण विजेत्या चिरियुकिन पाठोपाठ २८ गुण मिळवत तो दुसरा आला. चिरियुकिनने ३२ गुण मिळवले.
(हेही वाचा – Sanjay Raut : Ram Mandir उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते)
रॅपिड फायर पिस्तुल हा भारतीयांचा लाडका प्रकार –
रॅपिड फायर पिस्तुल हा भारतीयांचा लाडका प्रकार मानला जातो. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये (Asian Olympic Qualifier) विजय कुमारने याच प्रकारात रौप्य पदक जिंकलं होतं. आशियाई स्तरावर सुरू असलेल्या या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आतापर्यंत ४ भारतीय नेमबाजांनी ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Asian Olympic Qualifier) भारताचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा म्हणजे १७ नेमबाजांचा चमू उतरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community