Satwik-Chirag Lose Final : मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत पराभव

पहिला गेम २१-७ असा जिंकून आणि तिसऱ्या गेममध्ये ७-३ अशी आघाडी असताना भारतीय जोडीला पराभव स्वीकारावा लागला. 

175
Satwik-Chirag Lose Final : मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत पराभव
Satwik-Chirag Lose Final : मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक आणि चिराग या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत पराभव
  • ऋजुता लुकतुके

मलेशियन ओपन या १००० रेटिंग गुण असलेल्या मानाच्या बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धेत भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीला पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत २१-८, १८-२१ आणि १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. चीनची अव्वल जोडी लियान विकेंग आणि वाँग चँग यांनी भारतीय जोडीचा पराभव केला. (Satwik-Chirag Lose Final)

खरंतर दीड तास चाललेल्या या सामन्यात एका तासापेक्षा जास्तीच्या खेळात भारतीयांचंच वर्चस्व होतं. पहिला गेम तर भारतीय जोडीने १० मिनिटांत २१-९ असा जिंकला. चिरागचा नेट जवळून केलेला चपळ खेळ प्रतिस्पर्धी जोडीच्या पचनी पडत नव्हता. पण, त्यानंतर खेळाचा वेग राखण्याच्या नादात दोघांकडून चुकाही झाल्या. आणि उलट प्रतिस्पर्धी चिनी जोडीने भारतीय जोडीतील कच्चे दुवे ओळखून खेळ केला. (Satwik-Chirag Lose Final)

पहिला गेम आरामात जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये दोन्ही जोड्यांनी वेगवान आणि नेट जवळून सर्व्हिस करण्यावर भर दिला. हा गेम चांगलाच चुरशीचा झाला. आणि दोघांचा खेळही तुल्यबळ होता. धावफलक सतत एक किंवा दोन गुणांचा फरकच दाखवत असला तरी भारतीय जोडीला दुसऱ्या गेममध्ये आघाडी कधीच घेता आली नाही. भारतीय जोडी १५-१७ अशी पिछाडीवर असताना मात्र चिरागकडून (Chirag Shetty) सर्व्हिस परतवताना चुका झाल्या. आणि त्याचा फायदा घेत चिनी जोडीने दुसरा गेम २१-१७ असा जिंकला. (Satwik-Chirag Lose Final)

(हेही वाचा – Mercedes-Benz GLA 2024 : मर्सिडिझ बेंझची नवीन जीएलए एसयुव्ही कार कशी आहे? काय आहे किंमत?)

तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडी ११-७ अशी आघाडीवर होती. आणि हा सामना आता नियंत्रणात आलाय असं वाटत असतानाच चिनी खेळाडू वाँगने खेळाचा नूर पालटला. फ्रंट कोर्टवर येत त्याने गुण जिंकण्याच्या संधी निर्माण केल्या. आणि चिनी जोडीने गुण मिळवलेली. १२-१२ वर जी बरोबरी झाली, त्यानंतर भारतीय जोडीला सामन्यावर नियंत्रण मिळवणं कठीण गेलं. (Satwik-Chirag Lose Final)

अखेर चिनी जोडीने १९-१६ अशी आघाडीही घेतली. आणि तिथे भारतीय जोडीचा पराभव स्पष्ट झाला. (Satwik-Chirag Lose Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.