Raj Thackeray : तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल- राज ठाकरे यांचा कोकणवसियांना इशारा

मी गेले अनेक वर्ष पुणे, नाशिक ठाणे, मुंबई सगळीकडे सतत एकच गोष्ट सांगतोय. आपल्या जमिनी जात आहेत याचा अंदाज मराठी माणसाला आहे का ? बाकीच्या राज्यात त्यांचे नेते आधी माणसांचा विचार करतात मात्र आपलीकडे ते होत नाही.

215
Raj Thackeray : तुमची हक्काची जमीन गेली तर कपाळाला हात लावायची वेळ येईल- राज ठाकरे यांचा कोकणवसियांना इशारा

महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूनी हे प्रयत्न सुरु आहेत. हा तर पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही याच गांभीर्य सर्वांना कळायला हवं. तुमच्याकडच्या जमिनी हातातून चालल्या आहेत. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही परंतु पुढच्या ४-५ वर्षात ती जाईल. त्यामुळे डोळे उघडे ठेवा. तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर ती परत येणार नाही महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी जात आहेत. असा धोक्याचा इशारा मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे यांनी कोकणवसियांना दिला. (Raj Thackeray )

सोमवारी अलिबाग (Alibaug) येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, स्थानिक लोक जमिनी विकत आहेत यासंदर्भात मी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याजवळ भेटीमध्ये बोललो आहे व याचसाठी मी तिथे गेलो होतो त्यांचीकडे फार मोठी ताकद आहे त्यांच्या माध्यमातून यासाठी लोकांचे प्रबोधन करावे यात करणासाठी आपण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.(Raj Thackeray)

काश्मीर मध्ये ३७० रद्द केले. हे कलम म्हणजे तिकडे जाऊन जमीन विकत घेऊ शकत नाही. हिमाचल प्रदेश, आसाम,मिझोराम या प्रदेशातील जमीन विकत घेऊन दाखवा. आपल्याकडे अंतर्गत अनेक राज्ये आहे. जिथे मोठा उद्योग काढणार असाल तर जमीन मिळेल. परंतु इतर गोष्टींसाठी सरकारच परवानगी देत नाही. स्थलांतरित कायदा वाचा. आज आपल्याकडे कायदा वापरला जात नाही. तुमच्याकडच्या जमिनी हातातून चालल्या आहेत. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. परंतु पुढच्या चार ते पाच वर्षात ती हाताबाहेर जाऊ शकते असा धोक्याचा इशाराही राज ठाकरे यांनी कोकणवासियांना दिला. (Raj Thackeray )

आपल्या जमिनी जात आहेत याचा अंदाज मराठी माणसाला आहे का ?

बाकीचे कसे हुशारीने आपल्या राज्यात घुसतात त्याचा नीट विचार करा. आपल्या महाराष्ट्रावर होणार जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींबाबत मला चर्चा करायची होती. मी गेले अनेक वर्ष पुणे, नाशिक ठाणे, मुंबई सगळीकडे सतत एकच गोष्ट सांगतोय. आपल्या जमिनी जात आहेत याचा अंदाज मराठी माणसाला आहे का ? बाकीच्या राज्यात त्यांचे नेते आधी माणसांचा विचार करतात मात्र आपलीकडे ते होत नाही.

(हेही वाचा :BMW i5 : बीएमडब्ल्यू कंपनीची पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली बिझिनेस क्लास सिडान गाडी)

जिल्ह्यात कोणते व्यवसाय येणार असतील तर तुम्ही पार्टनरशिप मागा.

हा पैसा तुमचा आहे. ट्रान्स हार्बर सुरु झाला,रोरो सेवा सुरु झाली. तुमच्या जमिनी हातातून जाणार आहेत. रायगड जिल्ह्यात कोणते व्यवसाय येणार असतील तर तुम्ही पार्टनरशिप मागा. तुमच्या पुढच्या पिढ्यांचे विषय संपतील. तुमच्या जमिनी कुणाच्या नावावर होतायेत याचा आढावा घ्या. कर्जत, खालापूर,नेरळ हा सगळा पट्टा हातातून जातोय. तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहिले पाहिजे.

अलिबागची भाषा बदलायला वेळ लागणार नाही.
आज पनवेलची अवस्था जाऊन बघा, भाषा बदलली. अलिबागची भाषा बदलायला वेळ लागणार नाही. मराठी राहणार नाही. तुम्ही हळूहळू हिंदीत बोलाल. मी ज्या धोक्याची सूचना देतोय ते मुंबईत झालंय. हे पुण्यात, ठाण्यात होतंय. ठाणे जिल्हा हा जगात एकमेव जिल्हा जिथे सर्वाधिक बाहेरून यणाऱ्या लोकांची संख्या आहे. रायगड जिल्ह्यात एक महानगरपालिका आहे. ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. इथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली का? बाहेरून रोज भरमसाठ लोक येतायेत त्यातून तिथली लोकसंख्या वाढली. आपल्यावर कुठल्या प्रकारचं आक्रमण होतय हे लक्षात घेता येत. मात्र लक्षात येईपर्यंत हातातून वेळ जाईल. त्यानंतर कपाळावर हात मारण्याची वेळ येईल अशीही भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.