- ऋजुता लुकतुके
महिंद्रा बोलेरो हा एकेकाळी भारतात आपल्या ताकदीसाठी प्रसिद्ध असलेला एसयुव्ही गाडीचा ब्रँड होता. आता याच गाडीचं नवीन व्हर्जन असलेली बोलेरो निओ प्लस ही एसयुव्ही गाडी कंपनी भारतीय बाजारात आणत आहे. पाच आणि सात प्रवासी बसू शकतील अशी ही दोन मॉडेल आहेत. आणि एप्रिल २०२४ पर्यंत ही नवीन गाडी रस्त्यावर धावतानाही तुम्हाला दिसू शकेल.
बाहेरून ही गाडी आधीच्या बोलेरो निओ श्रेणीसारखीच दिसते. पण, आता जास्त जागा आणि सिट्स सामावून घेण्यासाठी गाडीचा मागचा आकार मोठा झाला आहे. आणि तो प्रशस्त दिसेल असं डिझायनिंग कंपनीने या एसयुव्हीचं केलं आहे. गाडीचे टेललँपही मोठे आणि दिमाखदार आहेत. एखाद्या तगड्या एसयुव्ही गाडीचा लुक या गाडीला आहे.
Imposing design and signature style that makes the world look up to you.
Bolero Neo – The Asli SUV.#AsliHai #BoleroNeo #TheAsliSUV pic.twitter.com/7uu2KBI0po— Mahindra Bolero (@MahindraBolero) January 8, 2024
(हेही वाचा – Tej Pratap Yadav : “राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले…” ; तेज प्रताप यादवचे अनोखे विधान)
गाडीचं इंजिन अपेक्षेप्रमाणे ताकदवान
आधीच्या बोलेरो गाडीप्रमाणेच या गाडीतही पॉवर विंडो आहे. तसंच सहा स्पीकर असलेली इन्फोटेनमेंट यंत्रणाही आहे. गाडीच्या सगळ्यात पाठच्या काचेवरही वायपर आहे तसंच तिथे डीफॉगरही आहे. या गाडीचं इंजिन अपेक्षेप्रमाणे ताकदवान आहे. आणि यात २.२ लीटर क्षमतेचं इंजिन आहे जे ११८ बीएचपी इतकी ऊर्जा निर्माण करू शकतं.
गाडीत ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. बोलेरो निओ प्लस गाडीची सुरुवात १० लाख रुपयांपासून होते. आणि मॉडेलनुसार ती १२ लाखांपर्यंत जाऊ शकते. या गाडीची स्पर्धा भारतात असेल ती मारुती सुझुकी इर्टिगा, मारुती एक्सेल ६ आणि किया कॅरेन या गाड्यांशी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community