Kristalina Georgieva : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे नोकऱ्यांवर होणार परिणाम; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांनी सांगितली टक्वेवारी

AI चा प्रभाव विकसनशील देशांमध्ये कमी असू शकतो. जागतिक स्तरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे क्रिस्टालिना जॉर्जिव्हा (Kristalina Georgieva) म्हणाल्या.

189
Kristalina Georgieva : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे नोकऱ्यांवर होणार परिणाम; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांनी सांगितली टक्वेवारी
Kristalina Georgieva : आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे नोकऱ्यांवर होणार परिणाम; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालकांनी सांगितली टक्वेवारी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (International Monetary Fund) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी एक मोठे विधान केले आहे. ‘विकसित देशांमधील 60 टक्के नोकऱ्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा (Artificial Intelligence) परिणाम होईल’, असे क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या आहेत. स्वित्झर्लंडमधील (Switzerland) दावोस (Davos) येथील वार्षिक जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित रहाणार आहेत. त्यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जिव्हा बोलत होत्या.

(हेही वाचा – Mahindra Bolero Neo Plus : जाणून घ्या महिंद्राच्या नवीन एसयुव्हीचे फिचर्स आणि किंमतही)

IMF प्रमुखांच्या मते आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे जगभरातील नोकऱ्या धोक्यात येतील. असे असले, तरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) उत्पादकता पातळी वाढवण्यासाठी आणि जागतिक विकासाला चालना देण्यासाठी एक प्रचंड संधी प्रदान करेल.

नवीन IMF अहवालाचा हवाला देऊन क्रिस्टालिना जॉर्जिव्हा म्हणाल्या की, AI चा प्रभाव विकसनशील देशांमध्ये कमी असू शकतो. जागतिक स्तरावर सुमारे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे जितक्या उच्च-कुशल नोकर्‍या असतील तितका AI चा प्रभाव जास्त असेल.

(हेही वाचा – Army Day India : भारतीय सेनेच्या पराक्रमाचे स्मरण करणारा भारतीय सेना दिवस)

क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी यासाठी कोणत्या उपाययोजना काढू शकतो, तेही सांगितले. “आपण विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या देशांना वेगाने पुढे जाण्यास मदत केली पाहिजे. जेणेकरून ते कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे ऑफर केलेल्या संधींचा फायदा घेऊ शकतील. आर्टिफिशियल इंटेलिजेंस थोडी भीतीदायक आहे पण प्रत्येकासाठी ही एक जबरदस्त संधी आहे”, असे त्या म्हणाल्या. (Kristalina Georgieva)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.