अयोध्येत आम्हाला हॉटेल्स उभारण्यासाठी २५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये शाकाहारी सेव्हन स्टार हॉटेल्स बांधण्याचाही प्रस्ताव आहे, असे स्पष्ट करत अयोध्या हे लवकरच जागतिक दर्जाच्या सुविधांसह धार्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी व्यक्त केला.
एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. सध्या अयोध्या या धार्मिक नगरीमध्ये ५० हजारांहून अधिक भाविक राहण्याची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी गोरखपूर, आदित्यनाथ यांना गृहनगर, लखनौ आणि प्रयागराज यांना जोडण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर विकसित केला जाईल.
(हेही वाचा – Rohit Sharma : टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू)
पायाभूत सुविधांसाठी कोणतेही प्रयत्न नाहीत…
२०१७ पूर्वी अयोध्येत कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या. आम्ही गेल्या काही वर्षांत शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला, हे सर्व १० वर्षांपूर्वी व्हायला हवे होते, मात्र अयोध्येत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहराच्या विस्तारात जे लोक विस्थापित झाले किंवा त्यांची दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठापना पाडण्यात आले. त्यांना पुरेशी भरपाई देण्यात आली आणि दुकानांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community