IPL & T20 World Cup Preparations : आयपीएल महत्त्वाची असल्याचं शिवम दुबे का म्हणतो?

आयपीएलचा दीड महिन्यांचा कालावधी हा स्वत:वर काम करण्यासाठी खेळाडूंकडे असलेला मोलाचा वेळ आहे असं शिवमला वाटतं.

200
IPL & T20 World Cup Preparations : आयपीएल महत्त्वाची असल्याचं शिवम दुबे का म्हणतो?
IPL & T20 World Cup Preparations : आयपीएल महत्त्वाची असल्याचं शिवम दुबे का म्हणतो?
  • ऋजुता लुकतुके

डावखुरा घणाघाती फलंदाज शिवम दुबे (Shivam Dube) अफगाणिस्तान विरुद्ध लागोपाठ दोन अर्धशतकं करून सध्या फॉर्ममध्ये आहे. नुकतंच भारतीय संघात पदार्पण केलेला शिवम हा आयपीएल लीगची देण आहे. म्हणजे त्याचं अष्टपैलूत्व आणि जोरकस फटके खेळण्याची ताकद आणि कसब हे आयपीएलमधून पुढे आलं.

त्या आयपीएल स्पर्धेविषयी आताही शिवम सकारात्मक आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा दरवाजा ठोठावणाऱ्या खेळाडूंपैकी एक शिवम आहे. आणि त्यासाठी आयपीएलचा खूप उपयोग होईल, असं शिवमला वाटतं. या दीड महिन्यात आपल्याकडची कौशल्य आणि आपला फॉर्म घासून पुसून लख्ख करावा असा त्याचा विचार आहे.

(हेही वाचा – Ram Mandir: प्रतिष्ठापना सोहळ्यामुळे अयोध्येत ‘या’ मोठ्या कंपन्या गुंतवणुकीसाठी इच्छुक, स्थानिक उद्योग, छोट्या व्यापाऱ्यांचाही जागतिक पातळीवर ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न)

‘आयपीएल हे खूप मोठं व्यासपीठ आहे. राष्ट्रीय संघात येण्याचं स्वप्न पाहणाऱ्यासाठी आपला खेळ दाखवून देण्याची ती चांगली संधी आहे. विश्वचषक तर मलाही खेळायचाय. पण, त्यासाठी चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. त्यासाठी संधी म्हणून मी आयपीएलकडे बघतो. विश्वचषक अजून दूर आहे. आधी आयपीएल आहे,’ असं शिवमन अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हणाला.

शिवम दुबेसाठी (Shivam Dube) भारतीय संघातील आतापर्यंतचा छोटेखानी प्रवास फलदायी ठरलाय. 2 टी-२० सामन्यांत त्याने २ बळी मिळवतानाच १२३ धावाही केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्ट्राईकरेट १५० च्या वरचा आहे. संघाला गरज असताना शांत डोक्याने फटकेबाजी करण्याची हातोटी त्याच्याकडे आहे. इंदूरमध्ये त्याने लगावलेला एक फटका १०० मीटरचं अंतर कापून गेला.

आता शिवमला कामगिरीत सातत्य ठेवायचं आहे. आणि त्यासाठी खूप पुढचा विचार न करता, प्रत्येक सामन्याचा सकारात्मक विचार करायचा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.