MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

210
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय दिल्यानंतर आता त्यांच्या निर्णयाला उबाठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले असून खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरोधात याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप

मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरण (MLA Disqualification Case)  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. तसेच मर्यादित कालावधीत याबाबतचा निकाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणी १० जानेवारी रोजी राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय दिला. आता नार्वेकर यांच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पहावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.