राज्य सरकार दाओसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी (World Economic Forum) जात आहे. या वेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळात अधिक लोकांचा भरणा आहे, असा आरोप माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सरकारवर केला आहे. या दौऱ्यात सरकार 34 कोटी रुपये खर्च करणार असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकार परिषद घेतली. (Uday Samant On Davos)
(हेही वाचा – FASTag : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अनुभव उत्तम करण्यासाठी ‘एक वाहन एक फास्टॅग’ उपक्रमाचा आरंभ)
आमचा खर्च नंतर देऊ
माध्यमांशी बोलतांना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, लोकशाहीत त्यांना काहीही म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांनी 21 तारखेपर्यंत थांबायला हवे होते. लोकं नातेवाईकांना स्वत:च्या पैशाने घेऊन जात असतील, तर त्यावर हरकत घेण्याचे काम नाही. एमएमआरडीएचे पाच लोकांचे शिष्टमंडळ आहे. 3 कोटी 85 हजार रुपये त्यांचा खर्च आहे. त्यांची माहिती ते देतील. आमचा खर्च तुम्हाला नंतर देऊ. तो 34 कोटी नाही. खर्च सस्पेन्स ठेवतो.
त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही
उदय सामंत पुढे म्हणाले की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum) ज्यांनी सुरु केले त्यांचे आणि मुरली देवरा यांचे संबंध होते. मिलिंद देवरा (Milind Deora) यापूर्वीही परदेश दौऱ्यावर गेले होते. मंत्री म्हणून सर्वाधिक वेळा परदेशात गेलेले ते मंत्री आहेत. ज्यांनी पोलिसांच्या माध्यमातून उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले. त्यांनी इंडस्ट्री कशी चालवावी ? किती लोकांचं शिष्टमंडळ घेऊन जावं ? याचं मार्गदर्शन करण्याची गरज नाही.
(हेही वाचा – Aerial Demonstrations : मुंबईकरांनी अनुभवला भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांचा थरार)
आक्षेपाचं कारण काय ?
एमएमआरडीएचे पाच लोकांचे शिष्टमंडळ आहे. कार्यक्रम चांगला व्हावा; म्हणून तीन लोकांचे शिष्टमंडळ आधीच तिथे गेले आहे. ते स्वत:च्या खर्चाने गेले आहेत. त्यामुळे आक्षेपाचं कारण काय ? ज्यांनी कधी स्वत:च्या खिशातून पैसे काढले नाही, त्यांना हे अप्रूप असू शकते. राज्याचे आणि देशाचे नाव जगात वाढवण्यासाठी काही लोक स्वत:च्या खिशातून पैस देत असतील, तर त्यावर हरकत काय, असा प्रश्न उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community