Indian Army : भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख 16 ते 22 जानेवारीदरम्यान नेपाळ भेटीवर

140
Indian Army : भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख 16 ते 22 जानेवारी नेपाळ भेटीवर
Indian Army : भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख 16 ते 22 जानेवारी नेपाळ भेटीवर

भारतीय लष्कराच्या (Indian Army) दक्षिण कमांडचे प्रमुख आणि 11 गोरखा रायफल्स अँड सिक्कीम स्काऊट्सचे कर्नल आणि गोरखा ब्रिगेडचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल एके सिंह 16 ते 22 जानेवारीदरम्यान सरकारी दौऱ्यासाठी नेपाळला भेट देत आहेत.

या बहुआयामी दौऱ्यात निवृत्त सैनिकांचे योगदान, सेवा आणि बलिदानाचा सन्मान करणाऱ्या कार्यक्रमात त्यांच्यासोबतच्या संवादाचा समावेश असेल. ते राजदूत, नेपाळचे लष्करी अधिकारी आणि मान्यवरांशीही संवाद साधतील. ते माजी सैनिक योगदान आरोग्य योजना पॉलीक्लिनिक (ईसीएचएस) आणि निवृत्तीवेतन कार्यालयांना (पीपीओ) देखील भेट देतील.

(हेही वाचा –Photo Gallery: प्रतिष्ठापना सोहळ्याचा सर्वत्र जल्लोष, राम मंदिराची नवीन छायाचित्रे पाहिलीत का? )

भारत-नेपाळ संबंधांना बळकटी मिळेल
या भेटीमुळे भारत आणि नेपाळ यांच्यामधील परस्पर संबंधांना बळकटी मिळेल आणि सौहार्द आणि परस्परांविषयीच्या आदराची भावना वाढीला लागेल. आपल्या सन्माननीय माजी सैनिकांचा सन्मान करण्याची आणि दोन्ही राष्ट्रांमधील विशेष संबंध टिकवून ठेवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्याची आपली दृढ वचनबद्धतादेखील यामुळे अधोरेखित होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.