भारतीय पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी मलेशियातील पेनांग पर्यटनस्थळ उत्सुक असून त्यांच्यातर्फे सोमवार (१५ जानेवारी) मुंबईत रोड शो करण्यात आला. भारतीयांसाठी येथे अनेक आकर्षक सोयी-सुविधा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पेनांगचे पर्यटन मंत्री वान हॉन वाई आणि सीईओ अश्विन गुणसेकरन यांनी याविषयी पत्रकारांना माहिती दिली.
पेनांग ओडिसी ही यावेळी त्यांची थीम आहे. हनिमूनसाठी जाणारी जोडपी,तसेच व्यवसाय वृद्धीसाठी तेथे येणारे व्यावसायिक आणि कंपन्यांचे अधिकारी आदींचा पेनांगच्या पर्यटन क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत भर घालण्यात मोठा वाटा असल्याचे वान यांनी सांगितले. येथील भारतीय पर्यटकांची संख्या यंदा सव्वा सात टक्के वाढली असून क्रूझ टुरिझमदेखील वाढला आहे. पेनांगच्या पर्यटन क्षेत्रात भारतीय पर्यटक दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असेही गुणसेकरन म्हणाले.
(हेही वाचा –MHADA : गिरणी कामगार तथा त्यांच्या वारसांची पात्रता: विशेष अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ )
पेनांगच्या पुरातन स्थळांना युनेस्कोनेची मान्यता
पेनांगच्या पुरातन स्थळांना युनेस्कोनेही मान्यता दिली आहे. पूर्वेची सिलिकॉन व्हॅली अशी ख्याती असलेल्या पेनांगमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. चीन मधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकी कंपन्या येथे येत आहेत, असे वान हॉन म्हणाले. भारत, चीन तसेच मध्य पूर्वेतील पर्यटकांना येथे व्हिसा ऑन अरायव्हल मिळतो. पेनांग ते थायलंड यादरम्यान भरपूर थेट विमानसेवा असल्याने पर्यटकांना तेथेही जाता येईल. पेनांग ही मलेशियाची राजधानी आहे. येथे अनेक वॉटर पार्क, थीम पार्क असून येथील एका थीम पार्क मध्ये तर एक किलोमीटर लांबीची जगातील सर्वात मोठी वॉटर स्लाईड आहे. आशियातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यानही येथे असल्याचे गुणसेकरन म्हणाले.
आम्हाला भारताचा मोठा पाठिंबा
मालदीव व भारत यांच्यातील वादाचा पेनांगमध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांवर काहीही दुष्परिणाम होणार नाही. भारतीय पर्यटकांबरोबरचे व भारताबरोबरचे आमचे चांगले संबंध कायमच राहतील. आम्हाला भारताचा मोठा पाठिंबा मिळतो, असेही यावेळी सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community