Ayodhya Ram Mandir vs Congress workers : अयोध्येत भाविक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

अयोध्येत राम प्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी साजरा होणार आहे, याकरिता धार्मिक विधींना मंगळवार, (१६ जानेवारी) पासून सुरुवात होणार आहे. १८ तारखेला श्रीरामाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाणार असून धार्मिक विधी २१ जानेवारीपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली.

342
Ayodhya Ram Mandir vs Congress workers : अयोध्येत भाविक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी (१५ जानेवारी) अयोध्येत मंदिर (Ayodhya Ram Mandir vs Congress workers) परिसरात पक्षाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भाविकांचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद झाला. तसेच वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. अखेर पोलिसांना हस्तक्षेप करून प्रकरण शांत करावे लागले.

(हेही वाचा – Ram Mandir : २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची शक्यता)

दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली –

श्रीराम जन्मभूमी अयोध्येत २२ (Ayodhya Ram Mandir vs Congress workers) जानेवारी रोजी रामललाची प्रतिष्ठापणा होणार आहे. या दरम्यान सोमवार (१५ जानेवारी) काँग्रेस कार्यकर्त्यांनी राम मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे यूपी प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यासह पक्षाचे शिष्टमंडळ अयोध्या दौऱ्यावर आले आहे. ही मंडळी हनुमानगढीमध्ये दर्शन घेतल्यानंतर राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर थांबली. यावेळी काही लोकांनी एका कार्यकर्त्याच्या हातातून काँग्रेसचा झेंडा (Ayodhya Ram Mandir vs Congress workers) हिसकावून घेतला. यानंतर दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण शांत केले.

(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येत धार्मिक विधींना सुरुवात; कसे आहे नियोजन ? वाचा सविस्तर…)

भाजपचा राजकीय कार्यक्रम – काँग्रेस

येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir vs Congress workers) कार्यक्रमासाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे समाजातील विविध लोकांना निमंत्रण पाठवले जातेय. परंतु, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. काँग्रेस नेतृत्वाने याला भाजपचा राजकीय कार्यक्रम म्हटले असून, यावरुन सातत्याने टीकाही करत आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अयोध्येत पक्षाच्या झेंड्यासह (Ayodhya Ram Mandir vs Congress workers) पाहून भाविकांचा संताप अनावर झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

(हेही वाचा – Eknath Shinde: दावोस दौऱ्यात महाराष्ट्राचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय पूर्ण होणार – मुख्यमंत्री)

राज्यात मिळणार सार्वजनिक सुट्टी ?

उत्तर प्रदेश सरकारने २२ जानेवारीला अयोध्या येथे श्री राम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारदेखील २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची शक्यता असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (Ayodhya Ram Mandir vs Congress workers)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.