अमेरिकन लेखिका, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या ‘सूसन सानटाग’! (Susan Santag) तिने विशेषतः निबंध लिहिले आहेत. अगेन्स्ट इंटरप्रिटेशन, ऑन फोटोग्राफी, इलनेस अॅज मेटाफोर ही त्यांची पुस्तके खूप चालली तसेच द वे वुई लिव्ह नाऊ, द द वोल्कॅनो लव्हर आणि इन अमेरिका ह्या कादंबर्यादेखील चर्चेत आल्या.
सूसनचा जन्म न्यूयॉर्क शहरात १६ जानेवारी १९३३ रोजी झाला. १९६३ मध्ये तिची द बेनेफॅक्टर ही प्रायोगिक कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर चार वर्षांनी डेथ किट कादंबरी आली. या कादंबरीमुळे तिला कादंबरीकार म्हणून प्रशंसा प्राप्त झाली. “द वे वुई लिव्ह नाऊ” ही लघुकथा २४ नोव्हेंबर १९८६ रोजी द न्यू यॉर्करमध्ये प्रसिद्ध झाली.
(हेही वाचा – Dian Fossey: जगप्रसिद्ध प्राइमेटोलॉजिस्ट, चिंपांझी आणि गोरीला अभ्यासक)
६७ व्या वर्षी २००० मध्ये इन अमेरिका ही तिची शेवटची कादंबरी प्रकाशित झाली. व्हिएतनाम युद्धादरम्यान तिने प्रवास करून त्या संघर्षाबद्दल सविस्तर लिखाण केलं आहे. तिने साहित्य, फोटोग्राफी आणि मीडिया, संस्कृती, एड्स, आजार, युद्ध, मानवाधिकार आणि डाव्या विचारसरणीच्या राजकारणाविषयी विस्तृतपणे लिहिले. तिच्या कारकिर्दीच्या काळात ती एक वादग्रस्त व्यक्ती होती. तिच्या निबंधांनी आणि भाषणांनी प्रचंड गदारोळ माजवला आहे. तिच्या पिढीतील ती एक सर्वोत्कृष्ट समीक्षक होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community