इराणने इराकच्या सीमेजवळील इस्रायलच्या गुप्तहेर मुख्यालयावर क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या (Iran-Israel Conflict) रिव्होल्यूशनरी गार्ड्सने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गार्ड्सनी सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधातही हल्ले केले आहेत. अलीकडेच इराणमध्ये बॉम्बस्फोट झाला. ज्यात शेकडो लोक मारले गेले. इराणने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात इराणने मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला.
इराणच्या गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराकच्या उत्तरेकडील एरिबल शहराजवळ इस्रायलच्या मोसाद एजन्सीवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दहशतवादी गट आय. एस. च्या पथकांना नष्ट करण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. याबाबत सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, स्फोटाचा आवाज एरिबलच्या ईशान्येस सुमारे 40 किमी अंतरावर अमेरिकन दूतावास आणि नागरी वसाहतींपर्यंत ऐकू आला.
(हेही वाचा – Susan Santag: अमेरिकन लेखिका, कादंबरीकार आणि सर्वोत्कृष्ट समीक्षक)
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या कोणत्याही सुविधांवर परिणाम झाला नाही, मात्र या हल्ल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. किमान ४ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यामुळे विमानतळावर प्रवासी अडकून पडले आहेत.
एरिबलमधील अमेरिकन दूतावासाजवळ स्फोट
इराक शहरातील एरिबलमधील अमेरिकी वाणिज्य दूतावासाजवळही अनेक स्फोट झाल्याची नोंद आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळील ८ ठिकाणांना लक्ष्य करून करण्यात आलेला बॉम्बस्फोट अत्यंत हिंसक होता. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एरिबल विमानतळाजवळ ३ ड्रोनही पाडण्यात आले आहेत.
दोन बॉम्बस्फोटांमध्ये 100 लोकांचा मृत्यू
गेल्या आठवड्यात इराणमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता. या बॉम्बस्फोटामुळे इस्रायल-हमास युद्ध वाढण्याचा धोका वाढला आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन अरब देशांना भेट देण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेने या हल्ल्यासाठी हमासला जबाबदार धरले आहे, मात्र अमेरिकेने हे आरोप फेटाळले आहेत.
हेही पहा –