- ऋजुता लुकतुके
मैदानावरील कामगिरीमुळे विराट कोहली (Virat Kohli) चाहत्यांचा लाडका आहेच. शिवाय मैदानावरील सकारात्मक वागणूक, इतर खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि अधून मधून आपल्या अविर्भावाने प्रेक्षकांमध्ये उत्साह पसरवणं हे तो नियमितपणे करत असतो. पण, फलंदाजीच्या वेळी मात्र तो गंभीर आणि कामावर लक्ष केंद्रीत करतो. अशा विराट कोहलीचं (Virat Kohli) एक वेगळं रुप इंदूरच्या सामन्यात रविवारी बघायला मिळालं. (Virat Kohli)
विराटला (Virat Kohli) भेटायला मैदानात घुसलेल्या एका चाहत्याला विराटने सुरक्षारक्षकाच्या तावडीतून सोडवलं. विराट कोहली (Virat Kohli) लाँगऑनला क्षेत्ररक्षण करत असताना एक चाहता अचानक तिथे आला. आणि त्याने चक्क विराटला वाकून नमस्कार केला. काही सेकंदांनी सुरक्षारक्षक तिथे आले. आणि त्यांनी या चाहत्याला ताब्यात घेतलं. (Virat Kohli)
(हेही वाचा – Shahi Eidgah Survey : सर्वोच्च न्यायालयाने दिली मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला स्थगिती)
अशा अचानक आलेल्या चाहत्यामुळे सुरुवातीला विराट (Virat Kohli) गोंधळला होता. पण, मग त्याने पुढे येऊन सुरक्षारक्षकांना त्याला सोडण्याची विनंती केली. विराटने (Virat Kohli) चाहत्याला आलिंगनही दिलं. (Virat Kohli)
Virat Kohli requested security personnel to be gentle with the fan who touched his feet & hugged him! 🥲💖@imVkohli • #INDvAFG • #ViratGang pic.twitter.com/dX0ggwwy46
— ViratGang.in (@ViratGangIN) January 15, 2024
पोलिसांनी मात्र त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याच्याकडे सामन्याचं तिकीट होतं. तो नरेंद्र हिरवानी गेटमधून आत येऊन प्रेक्षकांच्या गॅलरीतून सामना पाहत होता. आणि तो स्वत;ला विराट कोहलीचा (Virat Kohli) चाहता म्हणवत होता. पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली आहे. आणि त्याचा मैदानात घुसण्याचा कुठलाही दुसरा हेतू नव्हता हे समजल्यावर त्याला सोडून दिलं. (Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community