मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मुंबई दौऱ्याला अवघे चार दिवस उरले आहेत. अशातच जरांगे यांनी सरकारला आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी चार – पाच दिवसांचा वेळ दिला आहे. ‘पाच दिवस बाकी, आरक्षणावर निर्णय घ्या अन्यथा मुंबईला जाणारच’ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना शनिवार २० जानेवारीच्या आत प्रमाणपत्र दयावे. तसेच २० जानेवारीच्या आतमध्ये सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, नाहीतर ठरल्याप्रमाणे आंदोलनासाठी मराठा समाज मुंबईला जाणार आहे, असे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सांगितले.
(हेही वाचा – Rahul Narvekar : ‘… म्हणून निकाल चुकीचा ठरत नाही’ ; ठाकरे गटाच्या टीकेला राहुल नार्वेकरांचे चोख उत्तर)
जरांगे यांनी केल्या सरकारकडे ‘या’ मागण्या –
सरकारने आरक्षणाबाबत (Manoj Jarange) लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. तसेच ज्यांच्या नातेवाईक व सगेसोयरे यांचे पुरावे कुणबी म्हणून उपलब्ध असतील त्यांना सरकारने लगेच कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अर्ज दाखल केल्यावर त्वरित प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, त्यासाठी गावागावांत शिबिरे ,अभियान राबवावे, शपथपत्रासाठी शासकीय मुद्रांक खरेदी करायला लावू नये आदी मागण्या जरांगे (Manoj Jarange) यांनी केल्या आहेत.
(हेही वाचा – Shahi Eidgah Survey : सर्वोच्च न्यायालयाने दिली मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाला स्थगिती)
सरकार षडयंत्र रचत आहे –
मनोज जरांगे (Manoj Jarange) पुढे बोलतांना म्हणाले की; “माझ्या २० तारखेच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काहीतरी षडयंत्र रचत आहे. याची मला माहिती आहे. मी याची खोलात जाऊन खात्री करून घेणार आहे.पण मला माहित आहे की सरकार नक्कीच माझ्या विरुद्ध खूप मोठं षडयंत्र रचणार आहे. कारण मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटत देखील नाही. (Manoj Jarange)
(हेही वाचा – Indian Postal Department: पोस्टाच्या तिकिटांद्वारे रामायणातील प्रसंगांना उजाळा, भारतीय डाक विभागाची अनोखी संकल्पना)
या लोकांना मराठा आरक्षणाचा विषय संपूच द्यायचा नव्हता –
मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून मोठं झालेल्या लोकांची मी दुकानं बंद केली आहेत. अशा लोकांचा असंतोष असून, मी त्यांना खपत नाही. मी आरक्षणाचा मुद्दा संपवायला निघाल्याने या लोकांना खूप वाईट वाटत आहे. या लोकांना मराठा (Manoj Jarange) आरक्षणाचा विषय संपूच द्यायचा नव्हता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community