Asian Olympic Qualifier : पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तुल प्रकारात योगेशला दुहेरी सुवर्ण

आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीयांची सुवर्ण लयलूट सुरूच आहे. योगेशने भारतासाठी स्पर्धेतील सातवं सुवर्ण जिंकलं.

188
Asian Olympic Qualifier : पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तुल प्रकारात योगेशला दुहेरी सुवर्ण
Asian Olympic Qualifier : पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तुल प्रकारात योगेशला दुहेरी सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

इंडोनेशियातील जकार्ता इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताच्या योगेश सिंगने (Yogesh Singh) पुरुषांच्या सेंटर फायर पिस्तुल प्रकारात वैयक्तिक आणि सांघिक असा दुहेरी सुवर्णवेध घेतला. २५ मीटर सेंटर फायर प्रकारात योगेशने अंतिम फेरीत ५७३ गुण मिळवले. रौप्य विजेत्या मुआद अल बलुशीपेक्षा तो सहा गुणांनी पुढे होता. या प्रकारात सहभागी झालेले इतर दोघे भारतीय पंकज यादव (५६७) आणि अक्षय जैन (५६४) हे अनपक्रमे चौथे आणि सहावे आले. (Asian Olympic Qualifier)

(हेही वाचा – Virat Kohli : मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकापासून जेव्हा कोहलीच वाचवतो…)

त्यामुळे भारतीय संघाचे एकूण १७०४ गुण झाले. आणि भारताने सांघिक सुवर्णही जिंकलं. (Asian Olympic Qualifier)

या स्पर्धेबरोबरच कुवेत शहरातही शॉटगन प्रकारातील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा सुरू आहे. तिथेही शॉटगनमध्ये दोन ऑलिम्पिक कोटा सोमवारी उपलब्ध होते. पण, राष्ट्रकूल विजेती श्रेयसी अंतिम फेरीत पाचवी आली. आणि तिचं ऑलिम्पिकचं तिकीट थोडक्यात हुकलं. महिलांच्या ट्रॅप प्रकारात तिला अंतिम फेरीत १९ गुणांवर समाधान मानावं लागलं. प्राथमिक फेरीत ती चौथी होती. आणि ऑलिम्पिक पात्रतेसाठी कांस्य पदकही पुरेसं होतं. (Asian Olympic Qualifier)

तिच्याबरोबर पुरुष विभागात लक्षयचंही ऑलिम्पिक तिकीट हुकलं. (Asian Olympic Qualifier)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.