कोरोनाचा डबल म्युटेंट, त्याची लक्षणे, उपचार पद्धती कोणती? विचारा प्रश्न थेट तज्ज्ञ डॉक्टरांना!

139

सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा जो म्युटेंट थैमान घालत आहे, त्याचा अजूनही सखोल अभ्यास झाला नाही. एक महिन्यात हा विषाणू इतका पसरला कि, ३० एप्रिल २०२१ या एका दिवसात देशभर ४ लाख कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या या कोरोनाच्या नव्या व्हायरसला कसे रोखायचे, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. असा परिस्थतीत कुणीही या विषाणूला हलक्यात घेऊ नये, त्याच्याविषयी इत्यंभूत माहिती असणे ही सध्याच्या घडीला एकप्रकारची आरोग्य साक्षरताच आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला याबाबत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल त्यांनी खुशाल २ मे रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या फेसबुक लाइव्हमध्ये सहभागी व्हावे!

New Project 9

कोण करणार हे फेसबुक लाईव्ह? 

इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक यांच्यावतीने ही फेसबुक लाईव्ह हा ऑनलाईन परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिकचे सुप्रसिद्ध एमडी (मेडिसीन) फिजीशियन डॉ. यतींद्र दुबे हे या कार्यक्रमात विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची सविस्तरपणे उत्तरे देणार आहेत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनसीस, सचिव डॉ. कविता गाडेकर, समन्वयक डॉ. पंकज भट, समन्वयक डॉ. सारिका देवरे यांनी याचे आयोजन केले आहे. रविवार, २ मे रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

(हेही वाचा : काय आहे ऑक्सिजन काँसंट्रेटर, त्याच कोण, कसा वापर करू शकताे? जाणून घ्या तज्ज्ञांची मते )

असे व्हा सहभागी!

झूम मीटिंगच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी…

https://us02web.zoom.us/j/88977207813?pwd=TkVpSXk0K0g4ZjJJdytEbWFXZGtRQT09

Meeting ID: 889 7720 7813
Passcode: 419796

फेसबुकद्वारे सहभागी होण्यासाठी… 

Facebook page link
https://www.facebook.com/nashik.ima.90

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.