Oyo Expansion Plan : ओयो कंपनी आध्यात्मिक पर्यटन शहरांमध्ये सुरू करणार ४०० हॉटेल

ओयो कंपनीचे संस्थापक रितेश अगरवाल यांनी कंपनीच्या विस्ताराची योजना आखली आहे. आणि यात शिर्डी, अयोध्या पुरी इथं त्यांना हॉटेल उभारायची आहेत. 

222
Oyo Expansion Plan : ओयो कंपनी आध्यात्मिक पर्यटन शहरांमध्ये सुरू करणार ४०० हॉटेल
Oyo Expansion Plan : ओयो कंपनी आध्यात्मिक पर्यटन शहरांमध्ये सुरू करणार ४०० हॉटेल
  • ऋजुता लुकतुके

देशात सध्या धार्मिक ठिकाणी पर्यटन वाढलं आहे. आणि ते पाहता ओयो कंपनीनेही (Oyo company) देशातील ४०० ठिकाणी नवीन हॉटेल उभारण्याची योजना आखली आहे. आणि यातली महत्त्वाची ठिकाणं आहेत ती कटरा-वैष्णोदेवी, पुरी, तिरुपती, पुरी, शिर्डी आणि वारणसी. अयोध्याही या यादीत आहे. या वर्षातच कंपनीला धार्मिक ठिकाणी एकूण ४०० जागा विकसित करायच्या आहेत. (Oyo Expansion Plan)

कंपनीचे संस्थापक रितेश अगरवाल यांनी कंपनीतर्फे मंगळवारी एक प्रसिद्धीपत्र जारी केलं आहे. धार्मिक ठिकाणी लोकांचं पर्यटन आणि देशांतर्गत प्रवास वाढल्यामुळे हे पाऊल उचलल्याचं यात म्हटलं आहे. (Oyo Expansion Plan)

(हेही वाचा – Manoj Jarange : चार – पाच दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या; अन्यथा…; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा)

ओयो पोर्टलवर अयोध्या शहरासाठीचा सर्च ३५० टक्क्यांनी वाढला

‘सध्या देशात धार्मिक पर्यटन खूप जोरात आहे. येत्या पाच वर्षात यात वाढ होईल अशीच चिन्हं आहेत. पर्यटन आणि निवास-जेवण या क्षेत्रात धार्मिक पर्यटनाचा वाटा येणाऱ्या दिवसांत वाढणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने ही गोष्ट अधोरेखित केली आहे. धार्मिक पर्यटनाच्या या पवित्र कामात आम्हीही आमचं योगदान देऊ इच्छितो,’ असं रितेश अगरवाल यांनी या पत्रकात म्हटलं आहे. (Oyo Expansion Plan)

ओयो हा हॉटेल शोधण्यासाठीचा टेक प्लॅटफॉर्म आहे. ‘ऑन युअर ओन’ म्हणजे तुमचं राहण्याचं ठिकाण तुमचं तुम्ही निवडा आणि तुम्ही राहत असलेल्या कालावधीत ते तुमचंच समजा, अशी ही संकल्पना आहे. हॉटेल ॲग्रिगेटर साईट असून स्वस्त दरात हॉटेल आणि होमस्टे उपलब्ध करून देण्याचं काम ही कंपनी करते. रितेश अगरवाल यांनी सुरू केलेली ही स्टार्टअप कंपनी आहे. (Oyo Expansion Plan)

अलीकडे ओयो पोर्टलवर अयोध्या शहरासाठीचा सर्च ३५० टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळे धार्मिक पर्यटनाची कल्पना सुचल्याचं रितेश अगरवाल यांनी पत्रकात म्हटलं आहे. (Oyo Expansion Plan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.