Devendra Fadnavis : उबाठा सेनेने हिंदूंचा अपमान करणे बंद करावे; देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

267
Eknath Shinde

राममंदिर हा राजकीय मुद्दा बनत आहे. राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी चालू आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) सत्ताधारी भाजप नेत्यांना लक्ष्य करतात. ज्यांचे राममंदिर (Ram Mandir Ayodhya) आंदोलनात कसलेही योगदान नाही. अशा प्रकारचे लोकं असे आरोप करून स्वत:चे हसू करून घेत आहेत. तसेच कोट्यवधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठा सेनेने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणे बंद करावे, असे प्रत्त्युतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) संजय राऊत यांना दिले आहे.

(हेही वाचा – Shankaracharya : अयोध्येतील श्रीराम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आलेली देशातील चार शंकराचार्यांची पीठे कोणती आणि काय आहेत त्यांची वैशिष्ट्ये?)

मी मुर्खांना उत्तरं देत नाही

‘मंदिर वही बनाएंगे’, असा नारा देणाऱ्यांनी मंदिर नीट जाऊन पहावे. अयोध्येतील राममंदिर (Ram Mandir Ayodhya) मुख्य स्थळापासून 3 ते 4 किलोमीटर दूर बांधले आहे. ज्या ठिकाणी अयोध्येत राममंदिर बनवण्याचे ठरले होते. त्या ठिकाणी ते मंदिर बनले नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

फडणवीस यांनी पुढे बोलताना, “आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की, मी मुर्खांना उत्तरं देत नाही. मात्र मी इतके सांगेन की देशातील हिंदूंचा अपमान बंद करा. तुमचं रामजन्मभूमी आंदोलनात कोणतेही योगदान नाही.”

(हेही वाचा – Hyundai Creta 2024 : ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्टसाठी तुम्ही तयार आहात का?)

पुन्हा एकदा डिवचले 

नुकतेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘आम्हाला उबाठा असे म्हणू नका’, असे म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका पत्रकार परिषदेत उबाठा म्हणत त्यांना डिवचले होते. आता फडणवीसांनी पुन्हा एकदा उबाठा सेना (Ubatha Sena) म्हणून उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.