Dada Bhuse : विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे

नाशिक जगातील सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनी केले.

320
Dada Bhuse : विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे
Dada Bhuse : विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे

नाशिक जगातील सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी तरुणांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मंगळवारी (१६ जानेवारी) केले. दरम्यान, या युवा महोत्सवात यजमान महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले, तर हरियाणा आणि केरळने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. (Dada Bhuse)

नाशिक येथे केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय आणि राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या २७ व्या क्रीडा महोत्सवाचा मंगळवारी सकाळी महायुवाग्राम, हनुमाननगर येथे समारोप झाला. त्यावेळी पालकमंत्री भुसे (Dada Bhuse) अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक वनिता सूद, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे उपस्थित होते. प्रारंभी युवा गीत आणि महाराष्ट्र राज्य गीत सादर करण्यात आले. (Dada Bhuse)

(हेही वाचा – Shivsena : दोन्हीकडील आमदार पात्र ठरवून विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला; असीम सरोदेंचा आरोप )

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे नियोजन केले. त्यासाठी संबधित अधिकारी व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वेळोवेळी महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे युवकांच्या या कुंभमेळ्याचे यशस्वीपणे संयोजन करता आले. या महोत्सवाच्या पाच दिवसांत नाशिककरांनी युवकांना भरभरून प्रोत्साहन दिले. त्यामुळे यजमान महाराष्ट्रासह नाशिककरांच्या आदरातिथ्याचा नावलौकिक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. (Dada Bhuse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.