Shiv Sena MLA Disqualification : …तेव्हा जनतेने ठरवावे, तेव्हा कुणाला पुरावे, गाडावे कि तुडवावे; उद्धव ठाकरे यांचे आव्हान

Shiv Sena MLA Disqualification : आपण निवडणूक आयोगाच्या विरोधात खटला दाखल केला पाहिजे. 39 लाख प्रतिज्ञापत्रे दिली होती, त्यावर निवडणूक आयोग झोपले होते का ? त्यांनी काहीच केले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

180
Shiv Sena MLA Disqualification : ...तेव्हा जनतेने ठरवावे, तेव्हा कुणाला पुरावे, गाडावे कि तुडवावे; उद्धव ठाकरे यांचे आव्हान
Shiv Sena MLA Disqualification : ...तेव्हा जनतेने ठरवावे, तेव्हा कुणाला पुरावे, गाडावे कि तुडवावे; उद्धव ठाकरे यांचे आव्हान

गेल्या आठवड्यात राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अर्थात लवादाने जो निकाल दिला त्याविरोधात सर्वोच्च न्य्यायालयात आम्ही गेलो आहोत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आधी जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. हा सूर्य हा जयद्रथ. माझे आव्हान आहे. माझ्यासोबत मिंधेने आणि नार्वेकर यांनी यावे आणि शिवसेना कुणाची हे सांगावे, तेव्हा जनतेने ठरवावे, तेव्हा कुणाला पुरावे, गाडावे कि तुडवावे हे ठरवू. आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो त्यानंतर मिंधे गट उच्च न्यायालयात गेले, म्हणजे टाइमपास करायचा. मग मी आव्हान करतो, जर तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हाला नाही, मग राज्यपालांकडे जावा आणि विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वासाचा ठराव मांडा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. व्हीप आम्हाला लागू होणार नाही, व्हीप म्हणजे चाबूक असतो. लाचारांच्या हातात चाबूक शोभत नाही. आपण निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात खटला दाखल केला पाहिजे. 39 लाख प्रतिज्ञापत्रे दिली होती, त्यावर निवडणूक आयोग झोपले होते का ? त्यांनी काहीच केले नाही. आमचे अधिकार आम्हाला पुन्हा द्या, नाही तर त्याची भरपाई द्या, असा घणाघाती हल्ला उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.  (Shiv Sena MLA Disqualification)

(हेही वाचा – Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप)

24 तासांत काय होईल तुम्हाला कळेल

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णय कसा चुकीचा होता, हे पुराव्यानिशी मांडण्यासाठी उबाठा गटाने महापत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 2013 मध्ये पक्षाच्या बैठकीत काय झाले तुम्ही पाहिले, तिथे कोणकोण होते ? नालायक माणसे एकत्र करून शिवसेनेला गिळायला निघालात, 24 तासांत काय होईल तुम्हाला कळेल. मी एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, मी कायदा बघत बसलो नाही. पण न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले त्यात राज्यपालांनी जी बैठक बोलावली तीच मुळात बेकायदेशीर होती. ही लढाई केवळ शिवसेनेची नाही, तर ही लढाई देशात लोकशाही टिकणार का? सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व, अधिकार अबाधित राहणार का?, हे स्पष्ट करणारी आहे, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा – Shiv Sena MLA Disqualification : उबाठाच्या महापत्रकार परिषदेत पुरावे, व्हिडिओ आणि बरेच काही…निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप)

तुझे काम जन्मदाखला बघण्याचे नाही

फाशीची शिक्षा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अधिकार दिला होता, पण फाशी देण्याचे काम जल्लादाचे असते, तो म्हणतो त्यांचा जन्म दाखलाच नाही, अरे तुझे काम जन्मदाखला बघण्याचे नाही. तसे जल्लाद राहुल नार्वेकर होते. आमची घटनाच निवडणूक आयोगाकडे (Election Commission) नव्हती, असे म्हणतात, मग ती गिळली का ?  जेपी नड्डा म्हणतात भविष्यात फक्त भाजपचं राहील, हे लोकशाहीला धरून आहे का? या महाराष्ट्रात बाळशास्त्री प्रभुणे जन्माला आले त्याच मातीत गद्दार कसे जन्माला आले? 2014 ला माझा पाठिंबा घेतला, लोकसभेला पाठिंबा घेतला, अमित शहा (Amit Shah) माझ्याकडे येत होते, तेव्हा तुम्हाला मी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख वाटत नव्हतो का? मी तुम्हाला एबी फॉर्म दिले, तुम्हाला मंत्री पदे दिली, तेव्हा मी पक्षप्रमुख नव्हतो का? सर्वोच्च न्यायालयाबाबत आमच्या मनात आदर आहेच, पण आजपासून मी ही बाब जनतेच्या दरबारात नेत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (Shiv Sena MLA Disqualification)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.