Kurla-Ghatkopar : डोंगरावरील झोपड्यांसह कुर्ला, घाटकोपरमधील पाणी पुरवठ्यात होणार सुधारणा

पूर्व उपनगरातील अनेक भागांमध्ये उंचावर वस्त्या वसलेल्या असून या उंचावरील वस्त्यांना कायमच कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महापालिकेच्या कुर्ला आणि घाटकोपरमधील उंचावरील वस्त्यांना योग्य दाबाने पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जलवाहिन्यांचे जाळे आता मजबूत करण्यात येणार आहे.

5719
Kurla-Ghatkopar : डोंगरावरील झोपड्यांसह कुर्ला, घाटकोपरमधील पाणी पुरवठ्यात होणार सुधारणा
Kurla-Ghatkopar : डोंगरावरील झोपड्यांसह कुर्ला, घाटकोपरमधील पाणी पुरवठ्यात होणार सुधारणा
  • सचिन धानजी,मुंबई

पूर्व उपनगरातील अनेक भागांमध्ये उंचावर वस्त्या वसलेल्या असून या उंचावरील वस्त्यांना कायमच कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे महापालिकेच्या कुर्ला आणि घाटकोपरमधील उंचावरील वस्त्यांना योग्य दाबाने पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जलवाहिन्यांचे जाळे आता मजबूत करण्यात येणार आहे. यासाठी एकूण ५८ ठिकाणी १६ हजार ८५३ लांबीच्या विविध व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (Kurla-Ghatkopar)

महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने पूर्व उपनगरातील घाटकोपर पश्चिम काथोडीपाडा येथील उंचावर वसलेल्या लोकवस्तीसाठी तसेच कुर्ला तसेच घाटकोपरमधील इतर ठिकाणच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ५८ ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यामध्ये ५० मि.मी. पासून ३०० मि.मी. पर्यंत व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. (Kurla-Ghatkopar)

(हेही वाचा – Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल; दीपक केसरकर यांचा आरोप)

काथोडीपाडा येथील उंचावरील वसलेल्या लोकवस्तीसाठी पाणी पुरवठा सुधारणा करण्यासाठी ८० व १५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी टाकण्यात येणार आहे याबरोबरच कुर्ला किस्मत नगर, काजूपाडा, टॅक्सीमेन कॉलनी, मॅच फॅक्टरी लेन, खैरानी रोड, टाकीयावॉर्ड, विक्रोळी सर्वेक्षर मंदिर मार्ग, पार्कसाईट, घाटकोपर आझाद नगर, भटवाडी, बर्वेनगर, भीमनगर, काजूपाडा, चिराग नगर, पळशीवाडी, सीजीएस कॉलनी, एलबीएस रोड, किरोळ गाव, गोळीबार रोड, अंकुश गावडे मार्ग जंक्शन, संत ज्ञानेश्वर मार्ग, पंत नगर, गुरुदत्त मंदिर मार्ग, वल्लभलेन, राजावाडी, कामराज नगर अशा एकूण ५८ ठिकाणी अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामांसह एकूण २१ हजार ६६ मीटर लांबीच्या नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या सर्व जलवाहिनी टाकण्याच्या कामांसाठी सुमारे ४१ कोटी रुपये खर्च केले जाण्याचा अंदाज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Kurla-Ghatkopar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.