लता मंगेशकर चौक : -
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेली वीणा. या ४० फुटी लांब विणेवर सुंदर नक्षीकाम केले आहे. त्यावर सरस्वती देवीचे चित्रही कोरलेले आहे.
सूर्यस्तंभ : -
अयोध्येतील धर्मपथाच्या दोन्ही बाजूला 30 हून अधिक सूर्यस्तंभ उभारण्यात आले आहेत. त्यावर लावलेल्या सूर्याच्या आकाराचे दिवे लक्ष वेधून घेतात.
हनुमानगढी : -
अयोध्येच्या मध्यभागी स्थित हनुमानगढीला 76 पायर्या आहेत. उत्तर भारतातील भगवान हनुमानाच्या सर्वांत लोकप्रिय मंदिरांपैकी हे एक आहे. राममंदिरात जाण्यापूर्वी प्रथम हनुमान मंदिरात जावे, अशी परंपरा आहे.
सूर्यकुंड : -
जेव्हा अयोध्येत प्रभु रामाचा जन्म झाला, तेव्हा भगवान सूर्य या ठिकाणी प्रकटले होते. याच ठिकाणाहून भगवान सूर्याने रामाचे बालपण पाहिले होते. एवढेच नाही, तर कुष्ठरोगाने त्रस्त होऊन या तलावात स्नान केल्यास त्याचे सर्व आजार बरे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
राम की पेडी : -
राम की पेडी हा भारताच्या उत्तरप्रदेश राज्यातील अयोध्येतील शरयू नदीच्या काठावरील घाट आहे. शरयूच्या नदीत पवित्र स्नान करण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने यात्रेकरू येतात.