शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) (UBT) गटाने कथित अन्यायाविरोधात वरळी येथील स्पोर्टस् काँप्लेक्समध्ये महापत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या अडीच तासाच्या महापत्रकार परिषदेत केवळ १० प्रश्रांना उत्तरे दिल्याने ही पत्रकार परिषद कमी आणि पक्षाची जाहीर सभा अधिक, अशी चर्चा पत्रकारांमध्ये होत होती. (UBT)
एक तास उशीर
पत्रकार परिषदेची वेळ दुपारी ३.३० ची ठरली होती. सभागृहात भव्य स्टेज, त्यावर बाळासाहेब ठाकरे, उद्धव, आदित्य यांचा फाटो, पक्षाचे नाव, मशाल चिन्ह आणि जनता न्यायालय लिहिलेला निओ-साईन स्क्रीन, ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे असे वातावरण या सभागृहात दिसले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे ४.३० ला आगमन झाल्यानंतर उबाठा (UBT) कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रम सुरु केला. (UBT)
(हेही वाचा – Dada Bhuse : विकसित भारतासाठी युवकांनी समर्पित भावनेने काम करावे)
थेट प्रश्नांना बगल
कार्यक्रमाच्या शेवटी ठाकरे यांचे २२-२३ मिनिटे राजकीय भाषण झाले आणि त्यानंतर १० प्रश्नांना ठाकरे उत्तरे देतील, असे जाहीर केले. त्यातही काही प्रश्नांना त्यांनी बगल दिली. तुम्ही निवडणूक आयोगाचा, विधानसभा अध्यक्षांचा निकाल अमान्य करता तर आता तुम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही का आणि म्हणून तुम्ही जनतेच्या न्यायालयात आलात? या प्रश्नावर ठाकरे यांनी पत्रकाराला उलट प्रश्न केला की, “माझा विश्वास आहे का, यामध्ये तुमचा विश्वास आहे का?” असा प्रतिप्रश्न केला. (UBT)
वडापाव, शेव-फापडा, ढोकळा
मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देणे भावनिक निर्णय होता का या प्रश्नावर, “त्या सुमारास माझं ऑपरेशन झालं होतं. मी या लोकांना काय कमी दिलं होतं. पण या लोकांनी मला एकदा सांगितलं असतं आम्हाला मराठमोळा वडापाव नको तर शेव-फापडा, ढोकळा हवा आहे. आणि त्याच्यासोबत कटिंग चाय पण द्या. मी दिला असता, त्यासाठी सूरतला जायची काय गरज आहे. ते उघड्या चेहऱ्याने फिरू शकत नव्हते म्हणून पळाले,” असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला. “सदसदविवेकबुध्दीला जागून मी राजीनामा दिला. मला सत्तेचा मोह तेव्हाही नव्हता आताही नाही मात्र मी सत्ता आणणार,” अशी पुष्टी त्यांनी जोडली. (UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community