अर्धवट अध्यक्ष, अर्धवट मी त्या अर्थाने बोलत नाही. पार्टटाईम अध्यक्ष किंवा पार्टटाईम वकील हे काम पूर्ण करू शकत नाही. यासाठी पूर्णपणे स्वतःला पक्षाकडे झोकून द्यायची गरज असते. हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे आणि कंपाउंडर जेव्हा ऑपरेशन्स करतात, त्यावेळी त्याचा निकाल काय होतो, हे आपण बघितलेले आहे. असे म्हणत राहुल नार्वेकरांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला.
पक्षाची घटना केवळ कपाटात ठेवायची नसते
उबाठा गटाने महापत्रकार परिषद घेऊन राहुल नार्वेकर यांच्या MLA Disqulification Case प्रकरणी घेतलेल्या निर्णयावर टीका केली. त्यानंतर नार्वेकर यांनी पत्रकार परिषद देऊन त्यावर खुलासा केला. पक्ष चालवणे हे जबाबदारीचे काम आहे, पक्षाची घटना केवळ कागदावर उतरवून ती कपाटात ठेवायची नसते. त्यावर कृती करायची असते. उबाठाने दाखवलेल्या पत्रात बदलेल्या घटनेचा उल्लेख नाही. 2013च्या पत्रात पक्षाच्या घटनेचा उल्लेख नाही. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाकडे असलेल्या पक्ष घटनेचा आधार घेण्याचा आदेश दिला होता. आयोगाने 1999 ची घटना दिली. आपण निवडणूक आयोगाकडे लेखी पत्राद्वारे शिवसेनेची सुधारित घटनेची प्रत द्यावी, अशी मागणी केली होती, असेही नार्वेकर म्हणाले.
झोपल्याचे सोंग केलेल्या माणसाला कसे उठवू शकतो?
आपण झोपलेल्या माणसाला उठवू शकतो, पण झोपल्याचे सोंग केलेल्या माणसाला कसे उठवू शकतो? त्यामुळे ठाकरे गटाला माझा MLA Disqulification Case प्रकरणावरील निर्णय समजेल अशी अपेक्षा कशी करता येईल? मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. 10 जानेवारी रोजी अपात्रतेच्या याचिके प्रकरणी जो निकाल मी जाहीर केला. तेव्हापासून आजपर्यंत काही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे काही गैरसज पसरवत आहे. ते दूर करण्यासाठी लोकांसमोर त्या प्रकरणाचे स्पष्टीकरण लोकांसमोर येण्याची गरज आहे. निकालानंतर या स्पष्टीकरणाची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community