आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर बुधवारी ( १७ जानेवारी) सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला शिंदे गटाकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारां विरोधात दाखल केलेल्या १३ याचिकांवर तातडीची सुनावणी होणार आहे. शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही?व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करत शिंदे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (MLA Disqualification)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी १० जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील निकाल त्यांनी दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचे सांगितलं. तर शिंदे गटाचे व्हीप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याच सांगत ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली. तसेच त्यांनी आमदार आपत्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवल नाही. (MLA Disqualification )
सकाळच्या सत्रातच शिंदे गटाच्या याचिकेवर तातडीची सुनावणी
ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील,राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख,भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी यांना अपात्र करा, अशी मागणी भरत गोगावलेंनी याचिकेतून केली आहे.बुधवारी सकाळच्या सत्रातच शिंदे गटाच्या याचिकेवर तातडीची सुनावणी पार पडणार आहे.
(हेही वाचा : Iran-Pakistan Conflict : इराणचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला)
‘त्या’ १४ आमदारांना निलंबित करण्याची मागणी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली.शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्यानं ठाकरे गटाच्या त्या १४ आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी होणार आहे.
हेही पहा –