Riots in Pakistan: पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांना अटक

पाकिस्तानातील प्रमुख लष्करी आस्थापनांवर झालेल्या हल्ल्यात सामील असलेल्या १०३ संशयितांवर लष्करी खटला दाखल करण्यात आला आहे.

202
Riots in Pakistan: पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांना अटक
Riots in Pakistan: पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांना अटक

पाकिस्तानात ९ मेला झालेल्या दंगलीप्रकरणी (Riots in Pakistan) माजी गृहमंत्री आणि अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख शेख रशीद ( Former minister Sheikh Rashid) (Former Home Minister and Awami Muslim League chief Sheikh Rashid) यांना मंगळवारी अटक करण्यात आली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानातील दंगलीप्रकरणी आस्थापनांवर तोडफोड आणि हल्ला करण्याचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

माजी मंत्री रशीद ९ मेला झालेल्या दंगलीच्या संदर्भात नोंदवलेल्या १४ प्रकरणांमध्ये जामिनासाठी एटीसीसमोर हजर झाले. त्यांना १४ पैकी १३ प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र न्यू टाऊन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या दंगलीच्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना रशीद म्हणाले की, ते गेल्या ४० दिवसांपासून भूमिगत होते. या काळात त्यांना अनेक गोष्टींचा विचार करण्याची संधी मिळाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पुढे ते म्हणाले की, ते नेहमीच पाकिस्तानी लष्कराच्या पाठीशी उभे राहिले आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांना सैन्याशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला.

पाकिस्तानातील प्रमुख लष्करी आस्थापनांवर झालेल्या हल्ल्यात सामील असलेल्या १०३ संशयितांवर लष्करी खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयितांना दोषी ठरवण्यात आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रकरणांमध्ये निकाल देण्यात आलेला नाही.

(हेही वाचा – Iran-Pakistan Conflict : इराणचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला )

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ पी. टी. आय. च्या कार्यकर्त्यांनी जिन्ना हाऊस (लाहोर कॉर्प्स कमांडर हाऊस) (Lahore Corps Commander House) मियांवाली हवाई तळ आणि फैसलाबादमधील आय. एस. आय. इमारतीसह अनेक लष्करी आस्थापनांची तोडफोड केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.