Terrorist Pannu : खलिस्तानी दहशतवादी पन्नूची पंतप्रधान मोदींना धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली.

204
Terrorist Pannu : खलिस्तानी दहशतवादी पन्नूची पंतप्रधान मोदींना धमकी

शीख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली. (Terrorist Pannu )

प्रजासत्ताक दिनासारख्या विशेष कार्यक्रमांपूर्वी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुत्सद्यांना धमक्या देणे ही खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याची सवय झाली आहे. अनेक वर्षांपासून पन्नू अशा कुरापत्या करत आहे.पी. टी. आय. या वृत्तसंस्थेला दोन व्हिडिओ आणि एक ईमेल मिळाला या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की, मोदी तुम्ही तुमच्या सुरक्षेशिवाय दिल्लीला येऊन दाखवा” अशी धमकी त्याने दिली आहे . (Terrorist Pannu )

(हेही वाचा : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल, जलमार्ग क्षेत्राशी संबंधित प्रमुख पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन)

खलिस्तानचा झेंडा फडकावून शहीद निज्जरच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही धमकी दिली आहे.तसेच पंजाब मधील गँगस्टर्सनी एसएफजेमध्ये भरती व्हावे असे आवाहनही त्याने केले.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.