Ayodhya: भारतात प्रथमच सौर नौकेने करा शरयू यात्रा, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी उद्घाटन

225
Ayodhya: भारतात प्रथमच सौर नौकेने करा शरयू यात्रा, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी उद्घाटन
Ayodhya: भारतात प्रथमच सौर नौकेने करा शरयू यात्रा, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी उद्घाटन

योगी सरकारकडून अयोध्येला आदर्श सौर शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता भारतात प्रथमच सौर नौकेने प्रवास करण्याची तयारी सुरू आहे. यू. पी. एन. ई. डी. ए. ने अयोध्येतील (Ayodhya) सरयू नदीवर (Sharyu river) नौका सेवेच्या नियमित सेवेकरिता आराखडा तयार केला आहे. सौर नौकेच्या माध्यमातून शरयू यात्रेचे आयोजनही केले जात आहे.

शरयू नदीत सौरऊर्जेवर चालणारी ई-बोट ( solar boat) सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील नवीकरणीय ऊर्जा संस्थेने (UPNEDA) अयोध्येतील शरयू नदीवर नौका सेवा नियमितपणे चालवण्यासाठी आराखडा तयार केला आहे. यासाठी शरयू नदीकिनारी देशातील विविध ठिकाणांहून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीचे सुटे भाग आणि इतर उपकरणे आणण्यात आली आहेत.

(हेही वाचा – War room at Airport : देशातील सहा शहरांमध्ये ‘वॉर रूम’ उभारणार; नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय )

सध्या, ही बोट तयार करण्याचे काम सुरू आहे. एक बोट पूर्ण केल्यानंतर चाचणी टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे. 22 जानेवारीला श्री राम जन्मभूमी मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या बोटीचे उद्घाटन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या नौकेची नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

सौर बोटीची वैशिष्ट्ये –
दुहेरी पद्धतीने चालणारी ही बोट १०० टक्के सौर ऊर्जेवर चालते. मुख्य म्हणजे बोट कॅटामरन श्रेणीतील आहे. सौर ऊर्जा आणि विद्युत उपकरणाद्वारे या बोटीला चार्ज करता येऊ शकते तसेच फायबरग्लास बॉडी असलेली बोट हलक्या वजनाची आणि टिकाऊ सामग्रीपासून बनलेली आहे. बोट चालवताना कोणताही आवाज किंवा पर्यावरणीय प्रदूषण होत नाही. ती एका वेळी 30 लोकांना सामावून घेऊ शकते. शरयू नदीतील नवीन घाटावरून चालवल्या जाणाऱ्या नौकेच्या प्रवासाचा कालावधी १ तासापासून ४५ मिनिटांपर्यंत ठेवला जाईल. नौकेच्या प्रवासाद्वारे भाविकांना शरयू नदीच्या काठावर वसलेल्या विविध ऐतिहासिक मंदिरे आणि स्थळांना भेट देता येईल. ही बोट पूर्णपणे चार्ज केल्यावर ५ ते ६ तासांच्या प्रवासाचे नियोजन करता येऊ शकते.

प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी उद्घाटन
पुण्यातील सनी बोट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेद्वारे ही बोट तयार करण्यात येत आहे. चेन्नई येथील सोर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून या बोटीमध्ये सौर ऊर्जेबाबत काम सुरू आहे. याविषयी यूपीएनईडीएचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण नाथ पांडे म्हणाले की, ही बोट १२ किलोवॅटच्या इलेक्ट्रिक आउटबोर्ड ट्विन मोटरवर आधारित आहे. या बोटीमध्ये ताशी 46 किलोवॅट क्षमतेच्या एलेप्टी बॅटरी बसविल्या आहेत आणि ती 30 प्रवासी आणि 2 कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत असतील. १७ ते १८ तारखेदरम्यान, बोट निर्जंतुकीकरणासह सर्व चाचणी प्रक्रियांमधून जाईल. २२ जनवरीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी या बोटीचे उद्घाटन होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.