Ind vs Afg 3rd T20 : विराट कोहली ‘या’ विक्रमांच्या उंबरठ्यावर

विराट कोहली खेळायला उतरला की, नवीन विक्रम सर होतात

199
Ind vs Afg 3rd T20 : विराट कोहली ‘या’ विक्रमांच्या उंबरठ्यावर
ऋजुता लुकतुके

विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत आतापर्यंत फलंदाजीचे अनेक विक्रम सर केले आहेत. आणि तो अशा वळणावर आहे की, नुसता खेळायला उतरला तरी नवीन विक्रम नावावर होतो. आताही टी-२० क्रिकेटमध्ये १२,००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त ६ धावांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय आणि ए श्रेणीतील सामने धरुन त्याने आतापर्यंत या प्रकारात ११,९९४ धावा केल्या आहेत. आणि हा मापदंड गाठणारा तो जगातील चौथा क्रिकेटपटू असेल.(Ind vs Afg 3rd T20)

टी-२० प्रकारात एक पर्व गाजवलेला ख्रिस गेल या यादीत अव्वल आहे. आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने तसंच विविध देशांतील लीगमध्ये मिळून त्याने आपल्या कारकीर्दीत १४,५६२ धावा जमवल्या आहेत. शोएब मलिकच्या खात्यात १२,९९३ तर कायरन पोलार्डच्या नावावर १२,४३० धावा जमा आहेत. (Ind vs Afg 3rd T20)

अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराटने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये पुनरागमन केलं आहे. १४ महिन्यांपूर्वी टी-२० विश्वचषकाचा उपान्त्य सामना तो खेळला होता. आता आगामी टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने तो पुन्हा भारतीय संघात परतला आहे. आणि पहिल्याच सामन्यात त्याने १६ चेंडूंत २९ धावांची खेळी साकारली. आक्रमक खेळ करण्याच्या नादात नवीन उल हकच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

(हेही वाचा : Ind vs Afg 3rd T20 : भारताला हवाय टी-२० मालिकेचा परिपूर्ण शेवट)

आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये विराटच्या नावावर ११६ सामन्यांमध्ये ४,०३७ धावा जमा आहेत. १२२ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आणि हे एकमेव शतक या प्रकारात त्याच्या नावावर आहे. टी-२०मध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या बाबतीत तो रोहीत शर्माच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.