जगातील सर्वोत्तम ६ तांदुळांच्या यादीमध्ये भारताच्या बासमती तांदळाला पहिले स्थान मिळाले आहे. पारंपरिक खाद्यपदार्थ, पाककृती आणि संशोधन यांचा आढावा घेणार्या ‘टेस्ट अॅटलस’ या संस्थेने ही यादी बनवली आहे. (Indian Basmati Rice)
(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिर सर्वसामान्यांना दर्शनासाठी कधी खुले होणार? जाणून घ्या …)
बासमतीला जगभरात मोठी मागणी
भारतात उत्पादन होणारा बासमती तांदूळ हा उच्च दर्जाचा सुगंधी तांदूळ आहे. त्याला जगभरात मोठी मागणी आहे. या यादीत दुसर्या क्रमांकावर इटलीचा ‘अरबोरियो’ तांदूळ (Arborio Rice) असून पोर्तुगालचा ‘कॅरोलिनो’ तांदूळ (CAROLINO RICE) तिसर्या क्रमांकावर आहे.
चव आणि सुगंध हे वैशिष्ट्य
‘टेस्ट अॅटलस’ने (Test Atlas) बासमती तांदळाविषयी सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘बासमती’ हा मूलतः भारत आणि पाकिस्तान या देशांत लागवड केला जाणारा लांब आकाराच्या तांदळाचा प्रकार आहे. या तांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे. शिजल्यावर याचे दाणे वेगळे रहातात.
(हेही वाचा – Kuki Terrorists: कुकी दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ला)
६५ टक्के बासमतीची निर्यात
तांदूळ निर्यातीत (Export of rice) भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताने विक्रमी २३ लाख टन तांदूळ निर्यात केला आहे, जो जागतिक बाजारपेठेतील एकूण तांदुळाच्या ४०.८ टक्के आहे. जगभरात भारत ६५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो, तर पाकिस्तान ३५ टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो. (Indian Basmati Rice)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community