BCCI Cricket Contracts : शिवम दुबे, यशस्वी जयसवालला बीसीसीआय करारबद्ध करणार

सध्या भारतीय संघात चमकदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयसवाल आणि शिवम दुबे यांना लवकरच बीसीसीआय करारबद्ध करणार असल्याची बातमी आहे.

179
BCCI Cricket Contracts : शिवम दुबे, यशस्वी जयसवालला बीसीसीआय करारबद्ध करणार
BCCI Cricket Contracts : शिवम दुबे, यशस्वी जयसवालला बीसीसीआय करारबद्ध करणार
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबर २०२३ पासून भारतीय संघात शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) यांनी सगळ्यात जास्त छाप पाडली आहे. त्या मागोमाग रवी बिश्नोई या फिरकीपटूनेही आपली चमक दाखवून दिली आहे. यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) तर हळू हळू टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीनही प्रकारात संघात जागा मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. तर शिवम दुबे (Shivam Dube) टी-२० मध्ये छाप पाडून चौथ्या क्रमांकाचा फलंदाज होऊ पाहतो आहे. या दोघांनी बीसीसीआयवरही कामगिरीची छाप पाडलेली दिसतेय. कारण, आतापर्यंत हे दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या (BCCI Cricket Contracts) करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नव्हते.

पण, मार्चमध्ये नवीन करार करताना या दोघांचा समावेश आता निश्चित मानला जातो आहे. टाईम्स वृत्तसमुहाने त्याविषयीची बातमी दिली आहे.

यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आक्रमक डावखुरा फलंदाज म्हणून संघ प्रशासनाला भरवशाचा वाटतो. तर शिवम दुबे (Shivam Dube) हा अष्टपैलू आहे. तसंच दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून तो वापरला जाऊ शकतो, असं राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि इतर प्रशिक्षकांचं म्हणणं आहे. आपली उपयुक्तता सिद्ध केल्यामुळेच मध्यवर्ती करारांसाठी या दोघांची नावं घेतली जात आहेत.

(हेही वाचा – Indian Basmati Rice : जगात भारी भारतीय बासमती; जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत पहिला क्रमांक)

‘निवड समिती आणि संघ प्रशासनाच्याही शिवमकडून अपेक्षा आहेत. म्हणूनच त्याला गोलंदाजीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. त्याने नियमितपणे ४ षटकं चांगली टाकली तर टी-२० विश्वचषकात तर तो उपयोगी पडणारच आहे. पण, पुढेही तो हार्दिक पांड्याला तीनही प्रकारात पर्याय ठरू शकतो. आणि त्यासाठी शिवमवर संघ प्रशासनाचा जोर आहे,’ असं सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आहे.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) वेस्ट इंडिज दौऱ्यावर आपली पहिली कसोटी मालिका खेळला. यात त्याने एका शतकासह कसोटीत ३१६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४५ धावांच्या वर आहे. टी-२० मध्ये तर त्याने ४७५ धावा केल्या आहेत त्या १६३ धावांच्या स्ट्राईकरेटने. म्हणूनच संघ प्रशासनाने इंदूरमधील सामन्यात शुभमन गिलच्या पुढे यशस्वीला संघात जागा दिली.

शिवम दुबे (Shivam Dube) ३ वर्षांपूर्वी भारतासाठी टी-२० मालिकेत खेळला होता. आणि आतापर्यंत २० सामन्यांमध्ये त्याने २७५ धावा केल्या आहेत. शिवाय ८ बळीही मिळवले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.