BJP लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढवणार

449
Lok Sabha Election 2024 : बंगालच्या या २२ जागांवर भाजपाचं विशेष लक्ष
Lok Sabha Election 2024 : बंगालच्या या २२ जागांवर भाजपाचं विशेष लक्ष
– सुजित महामुलकर
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीचे लोकसभा जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. यात भाजप सर्वाधिक जागा लढवणार असून शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १६ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर मुंबईत सहापैकी शिवसेनेला (shiv sena) फक्त २ जागा आणि भाजप (BJP) चार जागा लढवणार असल्याचे समजते.
राज्यातील एकूण ४८ लोकसभा जागांसाठी भाजप ३२, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी (NCP) ६ जागा असे गणित ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यात मुंबईतील सहा मतदार संघांचा समावेश असून या ६ पैकी भाजप (BJP) चार आणि शिवसेना दोन जागा लढवणार.
दक्षिण मुंबई शिवसेना आग्रही
मुंबईतील दक्षिण मुंबई या मतदार संघासाठी शिंदे हे  काँग्रेसमधून (Congress) नुकतेच शिवसेनेत आयात झालेले मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. मात्र भाजप (BJP) हा मतदार संघ सेनेसाठी सोडणार नसल्याचे सांगण्यात येते. दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे अपेक्षित आहे. शेवाळे यांनी २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा या मतदार संघाचे लोकसभेत (Lok Sabha) प्रतिनिधित्व केले आहे.

भाजप नवे चेहेरे उतरवणार 

उत्तर मध्य, उत्तर मुंबई आणि ईशान्य या तीन मतदार संघात भाजपचे नवे चेहेरे, उमेदवार, महायुतीकडून असतील. यात उत्तर मुंबईत भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांचे नाव आघाडीवर असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांना संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. उत्तर मध्य मुंबई मतदार संघात मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan)यांना डावलले जाऊ शकते.
कीर्तीकर यांना पुन्हा संधी
ईशान्य मुंबईतूनही भाजप (BJP) विद्यमान खासदाराऐवजी नवा चेहेरा देण्याच्या तयारीत असून पियुष गोयल यांच्याही नावाची जोरदार चर्चा या मतदार संघासाठी होत आहे. सद्या भाजपाचे मनोज कोटक (Manoj Kotak) या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. उत्तर-पश्चिम या मतदार संघात विद्यमान खासदार शिवसेनेचे गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.
राष्ट्रवादी-शिवसेना समाधान मानेल?
मुंबईत राष्ट्रवादी कमकुवत असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मजबूत स्थितित आहे, त्यामुळे केवळ ६ जागांवर अजित पवार (Ajit  Pawar) समाधानी होणार का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसेच शिवसेनेचे (शिंदे) मराठवाडा (Marathwada),  विदर्भ (Vidarbh), कोकण (konkan) तसेच उत्तर (Northern ) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) अस्तित्व आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर १४ खासदारांनी (Member of parliament) शिंदे यांना साथ दिली असताना १० जागांवर शिवसेना समाधान मानेल, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.